खैरेंच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा...!
खैरेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची सभा...!
औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची 20 एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. शाहनूरमिया दर्गाह जवळ श्रीहरी पॅवेलियन येथे हि सभा होणार आहे. यावेळी सभा स्थळाची पाहणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. त्यांच्यासोबत औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ, माजी महापौर नंदकुमार घोडले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किशोर तांगडे पाटील, शहर जिल्हा काँगेस राष्ट्रवादीचे अध्यक्ष खाजा भाई राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, काॅ. अभय टाकसाळ, अनिस पटेल, अशोक पटवर्धन यावेळी उपस्थित होते.
What's Your Reaction?