मुस्लिम समाजाने पाळला कडकडीत बंद, शहरात शांतता, कोणताही अनुचित प्रकार नाही...!

मुस्लिम बांधवांनी पाळला कडकडीत बंद, व्यापार बंद ठेवत नोंदवला घटनेचा निषेध...!
प्रेषित मोहम्मद पैगंबर व इस्लाम विरोधी वक्तव्य करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्याने समाजात संतापाची लाट... रामगिरी गुरु नारायण गिरी महाराजाला अटक करण्याची मागणी....
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या व इस्लाम विरोधी वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मुस्लिम समाजात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी आपली दुकाने व व्यापार बंद ठेवत रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करुन कडक शासन करण्याची मागणी केली.
बातमी वा-यासारखी पसरल्याने शहरातील मुख्य बाजारपेठ आज सकाळपासून बंद आहे. पैठण गेट येथील मोबाईल मार्केटचे अध्यक्ष शेख सलिम यांनी डि-24 न्यूजला सांगितले आज सकाळपासून येथील गजबजलेला मार्केट मोबाईल मार्केट, तिलकपथ कपडा मार्केट व चप्पल मार्केट, सब्जी मंडी या घटनेच्या निषेधार्थ बंद आहे. पोलिस आयुक्तांना शहरातील मान्यवर शिष्टमंडळाने भेटून विनंती केली आहे महाराजांवर गुन्हा दाखल करुन अटक करावी. बंद शांततेत करण्यात येत आहे. पोलिसांनी कारवाई केली नाही तर बाजारपेठ तीन चार दिवस बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सिटीचौक पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देऊन गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मोठा जमाव जमला होता. तणाव शांत करण्यासाठी यावेळी एमआयएमचे नासेर सिद्दीकी, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, समीर साजिद बिल्डर यांनी शांततेचे आवाहन केले. पोलिस सहकार्य करत आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना कार्यवाईचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. मुस्लिम धर्मगुरु व एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. वंचितचे नेते अफसरखान यांनी शहरात फिरून शांततेचे आवाहन केले व पोलीस आयुक्तांना संबंधितावर कार्यवाही करुन अटक करण्याची मागणी केली. समाजसेवक मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार पोलीस निरीक्षक यांना दिली. मुस्लिम इत्तेहाद फ्रंटचे अध्यक्ष जावेद कुरैशी यांनी लेखी तक्रार दाखल केली. समाजवादी पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांना शहर कार्याध्यक्ष अश्फाक जमील खान यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले. एमआयएमचे हाजी इसाक खान यांनी जीन्सी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार पोलीस निरीक्षक यांच्याकडे दाखल केली. शहरात विविध पक्ष संघटनांनी विविध पोलिस ठाण्यात तक्रार व संबंधित विभागाकडे दोषींवर कारवाई करण्याचे मागणीचे निवेदन दिले.
आज सकाळपासून डि-24 न्यूजने शहराचा फेरफटका मारला असता पैठण गेट, तिलकपथ, सिटी चौक, घासमंडी, शहागंज, रोशन गेट, किराडपुरा, कटकट गेट, बायजीपूरा, रहेमानिया काॅलनी, अल्तमश काॅलनी, संजयनगर, सेंट्रल नाका, जुना बाजार, रंगार गल्ली, रशीदपुरा, गणेश काॅलनी, हडको काॅर्नर, सईदा काॅलनी भागात बाजारपेठ बंद करून मुस्लिम बांधवांनी या घटनेचा निषेध नोंदवला. शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही
.
What's Your Reaction?






