आयटो कन्व्हेयन्शन नंतर जिल्ह्याचे पर्यटन येणार मुख्य प्रवाहात - अस्तिककुमार पाण्डेय

 0
आयटो कन्व्हेयन्शन नंतर जिल्ह्याचे पर्यटन येणार मुख्य प्रवाहात - अस्तिककुमार पाण्डेय

आयटो कन्व्हेन्शन नंतर जिल्ह्याचे पर्यटन येणार मुख्य प्रवाहात

- जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचा विश्वास 

- आयटो सदस्यांशी साधला आभासी पद्धतीने संवाद

औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) इंडियन असोसिएशन फॉर टूर ऑपरेटर्स (आयटो) च्या 38 व्या राष्ट्रीय कन्व्हेन्शनसाठी शहर सज्ज होत आहे. या कन्व्हेन्शनच्या नंतर हे शहर पर्यटनाच्या मुख्य प्रवाहात येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय आणि महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला. 

शहरात आयोजित करण्यात आलेल्या आयटोच्या 38 व्या राष्ट्रीय कन्व्हेन्शनसाठी शहर सज्ज होते आहे. या आयोजनाची माहिती देण्यासाठी आयोजित दिल्ली येथील कार्यक्रमात जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय आणि महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी आभासी पद्धतीने हजेरी लावली. 

जिल्ह्यात असलेली पर्यटनस्थळे आयटो आणि त्यांच्या सदस्यांसाठी सज्ज होत आहेत. जगाला भुरळ घालणारी ही पर्यटनस्थळे पाहून या शहराचा समावेश आपल्या मुख्य पर्नयटननरीत टूर ऑपरेटर करतील अशी अपेक्षा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केली. 

आयटो सदस्यांच्या स्वागतासाठी शहर सजवले जात आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचे 75 वे वर्ष साजरा करत असताना अशी प्रतिष्ठित परिषद शहरात होणे शहरासाठी आनंदाची बाब आहे. येथील सौंदर्य पाहिल्यावर ऑपरेटर्स या शहराला आपल्या विविध टूर पॅकेजेस मध्ये शहराला महत्वाचे स्थान देतील, अशी अपेक्षा जी श्रीकांत यांनी व्यक्त केली. पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन पाटील यांनी ऑपरेटर्सच्या स्वागतासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली असल्याचे सांगितले. 

---

टू टीयर शहरात पहिल्यांदाच होणार कन्व्हेन्शन: मेहरा

कायम मोठ्या शहरात होणाऱ्या या कार्यक्रमाला यंदा टीयर 2 शहरात नेण्याचा संकल्प आम्ही केला होता. त्यात आम्ही स्थानिक प्रशासनाच्या साथीने यशस्वी होतो आहोत. विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी या कन्व्हेन्शनसाठी प्रयत्न केले आहेत आणि या कार्यक्रमाचे पालकत्व त्यांनी घेतले आहे आणि सर्वपक्षीय नेत्यांनी याला हातभार लावला आहे. कन्व्हेन्शनचे समन्वयक जसवंत सिंग यांनी तब्बल दोन हजार वर्षांची साक्ष देणाऱ्या पर्यटन स्थळे असल्याचे यावेळी नमूद केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow