अभियांत्रिकी शाखेची अंतिम परीक्षा रखडली, वर्ष वाया जाण्याची विद्यार्थ्यांना भीती
अंतिम परीक्षा रखडली : अभियांत्रिकी शाखेत पदवीत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्ष वाया जाण्याची भीती
औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे . मास्टर ऑफ इंजीनियरिंग ची फायनल इयर द्वितीय वर्षाची द्वितीय सत्राची परीक्षा अद्यापही झालेली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. दरवर्षी आगस्ट मध्ये होणारी ही परीक्षा अद्यापही न झाल्याने वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थ्यांना वाटायला लागली आहे .
मास्टर ऑफ इंजीनियरिंग च्या द्वितीय सत्राच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करावे लागतात . अंतिम वर्षाची द्वितीय म्हणजेच फायनल परीक्षा झाल्यानंतर त्याचा निकाल लागतो व विद्यार्थी मास्टर ऑफ इंजिनिअर म्हणून उत्तीर्ण होतो. दरवर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत परीक्षा झालेली असते व निकाल जाहीर झालेला असतो. परंतु यंदा अद्यापही विद्यापीठाने यासाठी कोणत्याही तारखा जाहीर केलेल्या नाहीत.
विशेष म्हणजे इतर विद्यापीठांमध्ये ही परीक्षा झालेली आहे.
बाटू मध्ये ही परीक्षा होऊन त्याचा निकाल जाहीर झालेला आहे . डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मात्र अजून यावरती कोणतीच हालचाल दिसत नसल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत . परीक्षा आमची कधी होणार व ही परीक्षा झाल्यावर निकाल कधी लागणार या गोष्टीने या चिंतेने त्यांची झोप उडवली आहे.
ही परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढे पीएचडी करता येते. परंतु पीएचडीच्या ऍडमिशन ची डेट ही संपून चालली आहे. विद्यार्थ्यांची मास्टर ऑफ इंजीनियरिंग ची दुसऱ्या वर्षातील द्वितीय सत्रातील ही डेजर्टेशनची परीक्षा लवकर घेऊन लवकर निकाल जाहीर करावा अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
What's Your Reaction?