महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांच्या पदयात्रेत उसळला जनसागर
 
                                "महायुतीचे उमेदवार श्री अतुल सावे यांच्या पदयात्रेत उसळला जनसागर"
सबको भावे, अतुल सावे च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला
छत्रपती संभाजीनगर : पूर्व मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी नारेगाव वार्ड क्रमांक 35 मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत शेकडो नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला आणि परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं.
"सबको भावे, अतुल सावे" या घोषणांनी नारेगावचा प्रत्येक कोपरा दुमदुमून गेला. पदयात्रेत स्थानिक तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला होता.
महायुतीच्या माध्यमातून प्रगतीशील नेतृत्वाच्या दिशेने श्री सावे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मतदारांच्या समस्या, स्थानिक विकास कामे आणि त्यावर श्री सावे यांच्या संकल्पनांचे स्पष्टीकरण पदयात्रेदरम्यान देण्यात आले.
या प्रसंगी अभिजीत देशमुख, दत्ता भांगे, नागेश भालेराव, बाळासाहेब सानप, कल्याण गायकवाड, शंकर पवार, गणेश भोकरे, जनाअप्पा पवार, गणेश गायकवाड, छगन काकडे, अमोल गोंडे, गजानन शिंदे, श्याम चंद्रे, श्याम नाडे, विशाल सानप, अंकुश दानवे, कार्तिक कुणाल गील, तेजस व्यवहारे, जंजाळ, ज्ञानेश्वर झिगे, भारत मलके, पांडुरंग देशमुख, कृष्णा पठाडे, कुंदन पवार, अनिल गायकवाड, शुभम दानवे, मुकुंद कवडे, विकी निंबाळकर, अशोक पांडे, ज्ञानेश्वर साळुंके, लष्करे मामा, नंदा गवळी, आबासाहेब जाधव,यादवराव सूर्यवंशी, दशरथ मनवतकर, सुरेश वीरगावकर, सागर भारती,शुभम दाभाडे, शुभम गायकवाड, श्याम तुपे यांची उपस्थि
 
ती होती.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            