जन्म - मृत्यू प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज व शुल्क स्विकारण्याचे आयुक्तांचे आदेश

 0
जन्म - मृत्यू प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज व शुल्क स्विकारण्याचे आयुक्तांचे आदेश

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज व शुल्क स्वीकारण्याचे आयुक्तांचे निर्देश...

झोन क्रमांक ८ ची आयुक्त अमोल येडगे यांनी केली पाहणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज)- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी आज झोन क्रमांक 8 कार्यालयाची पाहणी करून विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

जन्म व मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांना महापालिका कार्यालयात वारंवार येण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी अर्ज स्वीकारणे तसेच आवश्यक शुल्क भरण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जन्म व मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसून, ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुलभ आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी दिल्या. नागरिकांना जलद आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

आयुक्तांच्या पाहणीदरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow