पंतप्रधान आवास योजनेच्या घरासाठी 1 लाख रुपये डिपाॅझिट भरण्याचे आदेश, लाभार्थी चिंतेत, असा कसा झाला लकी ड्रॉ, का झाला हिरमोड...!

 0
पंतप्रधान आवास योजनेच्या घरासाठी 1 लाख रुपये डिपाॅझिट भरण्याचे आदेश, लाभार्थी चिंतेत, असा कसा झाला लकी ड्रॉ, का झाला हिरमोड...!

पंतप्रधान आवास योजनेच्या घरासाठी 1 लाख रुपये भरण्याचे आदेश, लाभार्थी चिंतेत, असा कसा झाला लकी ड्रॉ...! का झाला हिरमोड...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) - पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा सत्तेत आले त्यांनी सन 2016 मध्ये प्रत्येक गरीबांना पंतप्रधान आवास योजनेत घर देण्याची घोषणा केली. शहरातील गरजूंनी लाईन मध्ये लागून अर्ज भरले. आपल्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार भाड्याच्या घरात राहण्याची कटकट दूर होईल. गरीबांच्या आशा पल्लवित झाल्या. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही घर मिळाले नाही. शहरात भाडेकरुंची संख्या जास्त असल्याने स्वस्तात घरे सरकारी जागेवर बांधून मिळतील अशी अपेक्षा होती. अनेकदा लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला. त्यानंतर जागेचा शोध घेतला. शहरातील हर्सुल, पडेगाव, तीसगांव व सुंदरवाडी येथे अनेक अडथळे आल्यानंतर जागा निश्चित करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांची यादी सन 2025 मध्ये जाहीर करण्यात आली त्यानंतरही तीनदा जसजसे महापालिकेच्या सूचना आल्या लाभार्थ्यांनी अर्ज भरले. सन 2026 उजाडले. काही ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेसाठी घरांची इमारती बांधण्याचे काम सुरू झाले. लाभार्थ्यांना एसएमएस द्वारे महापालिकेकडून सुचना येत आहे. मनपाने लकी ड्रॉ साठी ऑनलाइन 5200 रुपये घेतले. लकी ड्रॉ न बोलावता लकी ड्रॉ बघण्यासाठी लाईव्ह लिंक पाठवली. चार ठिकाणी मनपा हद्दीत 11120 घरे बांधली जात आहे. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने 5177 पात्र लाभार्थी ठरले त्यामधून 4778 लाभार्थी ड्रा मध्ये निवडण्यात आले. तरीही त्यांना जेथे घर पाहिजे तेथे लकी ड्रॉ मध्ये नाव न येता दुस-याच ठिकाणी नाव आल्याने हिरमोड झाला आहे अशी प्रतिक्रिया आता लाभार्थ्यांकडून येत आहे. लाभार्थ्यांना एक लाख रुपये डिपाॅझिट भरण्याचे आदेश आल्याने आणखी हिरमोड होताना दिसत आहे. कमी उत्पन्न, मुलांचे शिक्षण, घराचे भाडे व अन्य खर्च कसा भागवायचा आणि एकरकमी एक लाख रुपये कोठून भरायचे याची चिंता आता त्यांना झाल्याचे दिसून येत आहे. एका विशिष्ट समाजाच्या लाभार्थ्यांना हर्सुल व पडेगाव येथे पंतप्रधान आवास योजनेत घर न देता सुंदरवाडी व तीसगांव येथे घर लकी ड्रॉ मध्ये नाव आले असल्याच्या तक्रारीही येत आहे. ड्रा काढताना काही विशिष्ट समाजाच्या नागरिकांना तिसगाव व सुंदरवाडी येथे घरे दिल्याचा आरोप सुरू झाला आहे त्यांनी अर्ज भरताना हर्सुल किंवा पडेगाव येथे घर द्यावे अशी मागणी केली होती. तेथे लाभार्थ्यांची संख्या जास्त नसताना असे घडले असाही आरोप प्रशासनावर होत आहे. यामध्ये काही गौडबंगाल आहे का असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. घर पाहिजे असेल तर एक लाख भरा पैसे भरायचे नसतील तर हक्क सोडा असा फर्मान लाभार्थ्यांना आला आहे. 10 ते 20 हजार रुपये डिपाॅझिट भरु शकतो. प्रशासनाने आमचा विचार करावा. कर्ज घेऊन घराचे हप्ते पूर्ण भरु पण एक लाख डिपाॅझिटची अट वगळावी अशी मागणी लाभार्थी करत आहे. 322.70 sq ft हे घर मिळणार आहे. 9 लाख ते 11.99 लाख रुपये पर्यंत घराची किंमत आहे. लाभार्थ्यांना अडीच लाख रुपये सबसिडी मिळणार असल्याने घराची किंमत आणखी कमी होणार आहे. 

एका महीला लाभार्थीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले मी चाॅइस अर्जात हर्सुल एक नंबरवर नंतर पडेगाव, सुंदरवाडी, तिसगाव असा क्रम भरला. माझ्या मुली शहरात शिक्षण घेत आहे मला लकी ड्रॉ मध्ये सुंदरवाडी येथे सहाव्या मजल्यावर घर मिळाल्याचा मॅसेज आला. यामुळे हिरमोड झाला काय करावे काही समजत नाही. एक लाख रुपये डिपाॅझिट भरण्यासाठी कोठून आणायचे. 10 एप्रिल पर्यंत उत्तर द्यायचे म्हटले आहे. दहा ते वीस हजार रुपये डिपाॅझिट भरु शकतो. बाकी पैसे कर्ज काढून भरु. 

हर्सुल येथील दुसऱ्या लाभार्थ्यांने सांगितले मी हर्सुलला राहते. मला तिसगाव येथे घर मिळाले एवढ्या दुर कसे जाणार माझी लेकरे लहान आहे. घरे जास्त लाभार्थ्यांची संख्या कमी तरीही पसंती प्रमाणे घर मिळाले नाही यामुळे हिरमोड झाला आहे. डिपाॅझिटची रक्कम प्रशासनाने कमी करावे. पैसे कसे भरायचे याचीही माहिती दिली नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow