गंदगी से है हमारा घाटा स्वच्छता से जोडो अपना नाता, मौलाना आझाद महाविद्यालयात महास्वच्छता अभियान

 0
गंदगी से है हमारा घाटा स्वच्छता से जोडो अपना नाता, मौलाना आझाद महाविद्यालयात महास्वच्छता अभियान

गंदगी से है हमारा घाटा स्वच्छता से जोडो अपना नाता...

मौलाना आझाद महाविद्यालयात महास्वच्छ्ता अभियान...

छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.3(डि-24 न्यूज) महानगरपालिका व स्मार्ट सिटी यांचे वतीने शहरात ०१ ते १५ ऑगस्ट दरम्यान मा.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून व उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रविंद्र जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

   या उपक्रमाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आज मौलाना आझाद महाविद्यालयातील NSS च्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात व परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.

त्या प्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले तसेच जीवनात अभ्यासाचे महत्व व करियर बद्दल मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य मज़हर फ़ारूक़ी 

NSS कार्यक्रम अधिकारी जे.डी.शेख ,स्वच्छता कर्मचारी, विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow