"साहिल की मैफिल" या सुफी हिंदी गितांचा बहारदार कार्यक्रम उत्साहात संपन्न...!

 0
"साहिल की मैफिल" या सुफी हिंदी गितांचा बहारदार कार्यक्रम उत्साहात संपन्न...!

‘साहिल की मैफिल’ या सुफी व हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम उत्साहात संपन्न....

शहराच्या साहिल सोनारच्या सुरेल आवाजाने रसीक झाले मंत्रमुग्ध!

 

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.27(डि-24 न्यूज)

संत एकनाथ रंगमंदिर येथे शहराचा भूमिपुत्र साहिल सोनार यांच्या सूफी व हिंदी बॉलीवुड गाण्यांचा ‘साहिल की मैफिल’ या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात साहिलने एकाहून एक सरस असे सुफी व हिंदी बॉलीवुड गाण्यांचे फ्युजन सादर करत उपस्थित श्रोत्याची मने जिंकली.

शहरातील महानगरपालिका शाळेतील मुख्याध्यापक श्री. संजीव सोनार यांचे चिरंजीव व गायक साहिल सोनार यांचा ‘साहिल की मैफील’ या सूफी गीत संगीत कार्यक्रमाचे आयोजन संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित करण्यात आले होते. यावेळी साहिलने लगी तुमसे मन की लगन, सासो कि माला से या गाण्यांसह नुसरत फतेह अली खान यांच्या आफरीन आफरीन सारखी गाणी गात उपस्थितांना गाण्यावर ठेका धरायला लावला.

रसिकश्रोत्यांनी टाळ्या व वन्स मोर ची दाद देत साहिलने सादर केलेल्या गाण्यांना भरभरून प्रतिसाद दिला. 

सोबत ख्यातनाम गायक वडाली बंधू यांनी गायलेल्या तू माने यांना माने दिलदारा असा दे तैनु रब मानेया, नुसरत फते अली खान यांचा दम मस्त कलंदर, जुनून अल्बम मधील सैयो नी ही सुफी तर तडप तडप के इस दिल से आह निकलती रही, मेरा पिया घर आया ओ रामजी यांसारखे हिंदी गीतं सादर करत रसिकांना सभागृहामध्ये शिट्ट्या-टाळ्यासह नृत्याचा ठेका धरायला लावला. 

या कार्यक्रमाचं उद्धाटन ज्येष्ठ गायक 

प्रा. राजेश सरकटे, विनोद सरकटे, माजी खासदार इम्तियाज जलील, उद्योजक कुणाल बाकलीवाल, हर्षवर्धन कराड, मनपा उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या हस्ते झाले तर निवेदन आरजे प्रेषित यांनी केले.

यावेळी शहरातील राजकीय, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह रसिक प्रेक्षकांनी मोठी हजेरी लावली होती.

शहरात साहिलच्या वाढदिवसानिमित्त खास 751 वा कार्यक्रम...

 साहिल सोनार ने आतापर्यंत देशभरात 750 कार्यक्रमात सादर केले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे वडील संजीव सोनार यांनी शहरातील पहिला व आतापर्यंतचा 751 वा साहिलच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला होता.

केवळ सुफि व हिंदी बॉलीवूडच नाहीतर मराठीतही विविध गीत सादर...

 सूफियाना व बॉलीवूड हिंदी गीत सादर करण्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या साहिल यांनी रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमात श्रोत्यांच्या आग्रहा खातर विविध मराठी गीत सादर केले यात प्रामुख्याने खेळ मांडला....., तुझी चाल तुरु तुरु, यासह विविध मराठी गीत सादर केले. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आरती सोनार, सागर व हर्षा सोनार यांनी

परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow