मनपाची धडक कारवाई, नागसेन काॅलनी परिसरात अनधिकृत अनेक नळ कनेक्शन कट

 0
मनपाची धडक कारवाई, नागसेन काॅलनी परिसरात अनधिकृत अनेक नळ कनेक्शन कट

मनपाची धडक कारवाई नागसेन कॉलनी परिसरात 33 अनधिकृत नळ जोडण्या खंडित...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)- शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. मनपाच्या विशेष शोध पथकाने नागसेन कॉलनी, रोशन गेट व आसिफिया कॉलनी परिसरात धडक कारवाई करत 33 अनधिकृत नळ जोडण्या तात्काळ खंडित केल्या.

नागसेन कॉलनी व रोशन गेटच्या मागील बाजूस असलेल्या आसिफिया कॉलनी परिसरात 200 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरून अनधिकृतपणे पाणी उपसा केला जात होता. या जोडण्यांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होऊन नागरिकांची गैरसोय होत होती. पथक अभियंता रोहित इंगळे, अनधिकृत नळ शोध पथक आणि माजी सैनिकांचा समावेश असलेल्या नागरी मित्र पथकाने संयुक्त कारवाई करत या सर्व 33 जोडण्या जागीच तोडल्या.

सदर धडक मोहीम मनपा अतिरिक्त आयुक्त-2 श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. या कारवाईत कार्यकारी कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड, उपअभियंता मिलिंद भामरे, उपअभियंता आनंद राजपूत, कनिष्ठ अभियंता सचिन वेलदोडे, अक्षय डुकले यांच्यासह पथकातील स्वप्निल पाईकडे, तमिज पठाण, तुषार पोटपिल्लेवर, ऋतिक वाघमारे आणि नागरी सहाय्यक पथकाचे स्वर्णसिंग परदेशी, देविदास सुसर, जनार्दन सांगळे, बालाजी साबळे व भोसले यांनी सक्रिय सहभाग घेतला.

शहरात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय आणि अनधिकृत नळ जोडण्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. आगामी काळात ही शोधमोहीम शहरभरात अधिक तीव्र केली जाणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले

आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow