पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळा, आरेफ काॅलनी, हिलाल काॅलनी येथे नागरिकांवर दंडात्मक कारवाई...
आरेफ व हिलाल कॉलनी येथे पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई...
पाणी बचतीसाठी मनपा आयुक्तांचे नागरिकांना आवाहन...
नळाला तोटी बसवा पाण्याचा अपव्यय टाळा... 15 ऑक्टोबर पर्यंत गळतीची कामे तातडीने पूर्ण करा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)- यंदाच्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी नुकतेच शहरातील सर्व नागरिकांना पाणी बचत करण्याचे तसेच पाण्याचा कोणत्याही प्रकारे अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
पाणी भरल्यानंतर नागरिकांनी तात्काळ नळ बंद करावा, तसेच पाणी रस्त्यावर, नालीमध्ये अथवा इतर ठिकाणी वाहून जाणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रत्येक नागरिकाने आपल्या नळांना योग्य तोटी बसवावी, असे आवाहनही करण्यात आले होते.
तसेच घरगुती नळ जोडणी, नळाच्या तोट्या आणि अंतर्गत जल वाहिनीतील गळती अथवा आवश्यक दुरुस्तीची सर्व कामे 15 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर पाण्याची गळती अथवा अपव्यय आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक 5000 ते 25000 रु पर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले. आहे.यात प्रथम वेळी 5000/- द्वितीय वेळी 10000/- व तृतीय वेळी 25000/- व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी व नागरी मित्र पथकाचे कर्मचारी आरेफ कॉलनी व हिलाल कॉलनी येथे गस्त घालत असताना पथकाला नळाचे पाणी रस्त्यावर सोडून देणारे अजहर कादिल यांच्या कडून 10000/- रु दंडात्मक कारवाई करण्यात आली.तसेच शेख अतिक यांच्या कडून नळाला तोटी न बसवणे व नळाचे पाणी रस्त्यावर सोडून दिल्या बद्दल 5000/- दंडात्मक कारवाई करण्यात आली.सदर कारवाई मां.आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार उप अभियंता भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता सचिन वेलदोडे ,लाईनमन सय्यद अबरार,सचिन पवार, स्वच्छता निरीक्षक व नागरी मित्र पथक कर्मचारी यांनी ही कारवाई पार पा
डली.
What's Your Reaction?