हर्सुल तलावात बुडून चौघांचा मृत्यू, 3 मित्रांचा समावेश, एका युवकाची आत्महत्या, शहरात हळहळ...

 0
हर्सुल तलावात बुडून चौघांचा मृत्यू, 3 मित्रांचा समावेश, एका युवकाची आत्महत्या, शहरात हळहळ...

हर्सूल तलावात बुडाल्याने चौघांचा मृत्यूने शहरात हळहळ...एका युवकाने केली आत्महत्या...कुटुंबावर दु:खाचा डोंगर...

मृतांमध्ये 3 मित्रांचा समावेश, घटनास्थळी प्रभाग 1 चे नगरसेवक अजहर पठाण, अशोक हिवराळे यांनी मदतकार्य केले...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) - शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ऐतिहासिक हर्सूल तलावात बुडाल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. यामध्ये हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 3 मित्रांसह एका युवकाचा समावेश असल्याची माहिती मनपा अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक अजहर पठाण व अशोक हिवराळे यांनी धाव घेतली व मदतकार्य केले. मृतकांपैकी सर्व चार जणांची ओळख उशिरा रात्री पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एन-12 हडको येथील रहिवासी यश संदीप देहाडे, वय अंदाजे 25 याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफान खान इस्माईल खान (17 वर्ष, राहणार निजामगंज, जूना होंडा, भवानीनगर , छत्रपती संभाजीनगर), शेख आदिल शेख मोहसीन (वय 15 वर्ष), राहणार भवानीनगर) करण रामचंद्र मोरे, वय 12, राहणार जटवाडा रोड, अंबर हिल, छत्रपती संभाजीनगर यांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. हर्सूल तलाव परिसरातील जांभूळवन जवळील पाण्यात तीन मुले बुडाल्याची माहिती अग्निशमन दलाला रविवारी दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास मिळाली. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, उप अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, ड्युटी अधिकारी वैभव बाकडे, लक्ष्मण कोल्हे, अग्निशामक जवान अशोक पोटे, विक्रम भुईगळ, शिवाजी काकडे, गजानन गावंडे, संग्राम मोरे, विजय कोथमीरे, सचिन शिंदे, गोपीचंद मोरे, महेंद्र खोतकर, शेख समीर, मोहम्मद दुशाज आदींनी घटनास्थळी धाव घेतली. 

अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्यात शोध मोहिम राबवून अफान खान इस्माईल खान, शेख आदिल शेख मोहसीन, करन मोरे यांच्यासह एका युवकाला बेशुध्दावस्थेत पाण्याबाहेर काढले. बेशुध्दावस्थेत असलेल्या चौघांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी चौघांनातही तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद हर्सूल पोलिस ठाण्यात करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत मृत अनोळखी व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरु होते

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow