पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना काँग्रेसच्या वतीने अभिवादन....

 0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना काँग्रेसच्या वतीने अभिवादन....

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे विनम्र अभिवादन...

शासकीय रुग्णालय (घाटी ) येथे खिचडी व फळ वाटप...

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज)

कुशल प्रशासक आणि प्रजानिष्ठ राज्यकर्त्या म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात गौरवले गेले आहे. प्रजेची उन्नती व विकास साधताना सामाजिक शांतता, समता, न्याय, स्वातंत्र्य या मुलभूत मानवी मूल्यांना अहिल्यादेवींनी आपल्या प्रशासन व्यवस्थेत प्राधान्य दिले आणि जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. 

आज शनिवारी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे त्यांच्या अहिल्याबाई होळकर चौक, रेल्वे स्टेशन रोड - पदमपुरा येथील पूर्णाकृती पुतळ्यास खा. डॉ. कल्याण काळे व शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली अभिवादन करण्यात आले व त्यानंतर शासकीय रुग्णालय (घाटी) येथे खिचडी, फळ वाटप करण्यात आले.

यावेळी खा. डॉ. कल्याण काळे, शेख युसूफ, माजी मंत्री अनिल पटेल, मा.आ.नामदेवराव पवार, जग्गनाथ काळे, भाऊसाहेब जगताप, इक्बालसिंग गिल, रवींद्र काळे, किशोर तुळशीबागवाले, उमाकांत खोतकर, डॉ. निलेश आंबेवाडीकर, राहुल सावंत, अतिश पितळे, अनिस पटेल, मोईन इनामदार, कैसर बाबा, सागर साळुंके, शफिक शहा, साहेबराव बनकर, महेंद्र रमंडवाल, मुद्दसिर अन्सारी, योगेश थोरात, अनिता भंडारी, उषा खंडाळे, रेखा भुईगळ, चंद्रप्रभा खंदारे, शेख निसार अहेमद, शेख युनूस, डॉ. अरुण शिरसाठ, सुभाष देवकर, चंद्रकांत मगरे, संघठन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल यांच्यासह मोठ्या प्रमाणावर काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow