महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा - 2025 साठी 221 खेळाडू जाणार...!

महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा-2025 साठी 221 खेळाडू जाणार...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज)
महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धा-2025 च्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील खेळाडुंकरिता विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे संकल्पनेतुन मार्गदर्शन शिबीराचे आयोजन …
दिनांक 22/02/25 ते दिनांक 01/03/25 दरम्यान ठाणे येथे होणा-या महाराष्ट्र पोलीस क्रिडा स्पर्धा -2025 मध्ये छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र व नांदेड परिक्षेत्र तसेच छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालय येथील 221 पोलीस खेळाडु ज्यामध्ये 165 पुरूष तर 56 महिला खेळाडू हे विविध क्रिडा प्रकारात आपले प्राविण्य दाखविणार आहेत.
या खेळांडुचे मनोधैर्य व सांघिक भावना वृध्दींगीत होण्याचे दृष्टीकोनातुन वीरेंद्र मिश्र, (भा.पो.से.) विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांचे संकल्पनेतुन त्यांचे करिता क्रिडा मानसोपचार व फिजिओथेरपिस्ट तज्ञांचे मार्गदर्शन शिबीराचे आयोजन आज दिनांक 20/02/2025 रोजी दुपारी 01:00 वा. आर्यभट्ट हॉल, एम.जी.एम. कॅम्प येथे करण्यात आले होते.
याप्रसंगी वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख व्याख्याते म्हणुन श्री. आश्विन क्षिरसागर (क्रिडा फिजिओथेरपिस्ट ), श्री नितीन घोरपडे (आर्यन मॅन तसेच क्रिडा संचालक, एम.जी.एम.) सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, सिध्देश्वर भोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पैठण तथा संघप्रमुख, तसेच श्रीमती पुजा नांगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी,छ. संभाजीनगर ग्रा. यांचे सह प्रशिक्षक, खेळाडु व पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती.
वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छ.संभाजीनगर परिक्षेत्र, यांनी खेळांडुचा यापुर्वीच्या स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेवुन खेळांडुना आगामी स्पर्धेकरिता आपल्या कामगिरीचा स्तर उंचावण्यासाठी मार्गदर्शन करतांना सांगितले कि, पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पैकी खेळाची गुणवत्ता असलेल्या खेळाडुनांच परिक्षेत्राचे राज्य पातळीवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाचे किंवा खेळाडूंचे आवाहन स्विकारून त्यांना झुंज देणे महत्वाचे आहे. आपली कमजोर बाजु समोरच्या संघाला किंवा खेळाडुला कळणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्यातील कमतरता कमी करण्यासाठी प्रयत्न करून समोर किती प्रतिभावान खेळाडु किंवा संघ आहे हा तणाव न घेता त्याकडे दुर्लक्ष करून स्वत:च्या खेळाकडे प्राधान्याने लक्ष देवुन त्याखेळाचे प्रती पुर्ण प्रयत्न आणि तयारी केल्याशिवाय यश संपादन करणे शक्य होत नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धा-25 मध्ये पहिल्यांदा सहभागी होणा-या खेळाडुनी सांघिक भावना ठेवुन ती विकसीत करण्यावर अधिक भर द्यावी. खेळाडुंना लागणा-या सोयी सुविधा, प्रशिक्षण या प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत यापुढेही परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणुन कायम त्यांचे सोबत उभा आहे असा खेळाडुमध्ये भरीव आत्मविश्वास निर्माण करुन त्यांना स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.
अपर पोलीस अधीक्षक यांनी सांगितले कि, छ.संभाजीनगर व नांदेड परिक्षेत्रातील खेळाडु हे मागील दिड महिण्यापासुन पोलीस मुख्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सलंग्न असुन त्यांच्या कामगिरीत सुधारणा होण्याकरिता खेळांडुना तज्ञ प्रशिक्षक, आहारतज्ञ, क्रिडा मानसोपचार तज्ञ, फिजिओथेरपिस्ट यांचे वेळोवेळी तांत्रिक प्रशिक्षण शिबीरे आयोजीत केली. तसेच खेळांडुना पुरक व सकस आहार हा त्यांचे दैनंदिन दिनचर्यामध्ये देण्यात आलेला असुन खेळाडुच्या कामगिरीचे दैनंदिन निरीक्षण व मुल्यमापन करून त्यांचे कामगिरीत सुधारणा घडवुन आणल्या आहेत. ज्यामुळे खेळाडु हे अधिक आत्मविश्वासाने स्पर्धेले सामोरे जातील आणि अधिकाअधिक यश संपादन करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
याप्रसंगी श्री. आश्विन क्षिरसागर (क्रिडा फिजिओथेरपिस्ट) यांनी खेळ आणि व्यायामामुळे होणा-या दुखपतींच्या प्रतिबंध आणि व्यवस्थापनाबाबत तसेच सरावा दरम्यान व प्रत्यक्ष स्पर्धे दरम्यान शारिरीक दुखापती टाळण्यासाठी व शारिरीक उर्जा पुर्नप्राप्तीसाठी मार्गदर्शन केले आहे.
तसेच श्री नितीन घोरपडे (क्रिडा संचालक एम.जी.एम तथा आर्यनमॅन) यांनी सुध्दा खेळाडुनी नियमित मेडिटेशन केल्याने खेळावर लक्ष केंद्रीत करण्यास मदत होते. खेळाचे आधीची धडपड ही उत्कंठा वाढविणारी असते यातुन खेळाडु हा तणावात जावुन त्याची अस्वस्थता पुर्ण वाढलेली असल्याने याचा परिणाम त्याचे कामगिरीवर होतो. त्यामुळे नकारात्मक परिणामाचा विचार न करता पुर्ण क्षमतेने खेळात सहभाग घेतल्यास शरिर सुध्दा मदत करते यामुळे विजय प्राप्त करणे सुकर होते असे सांगितले आहे.
यावेळी श्रीमती पुजा नांगरे,उपविभागीय पोलीस अधिकारी,छ.संभाजीनगर ग्रा. यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले आहे.
What's Your Reaction?






