साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी खा.डाॅ.कल्याण काळे यांनी घेतली बैठक

खासदार डॉ.कल्याण काळे यांच्या पुढाकाराने साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज)
मतदारसंघातील साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या पुढाकाराने सिडको भागात असलेल्या भविष्य निर्वाह निधी (PF) कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला कारखान्यांचे कर्मचारी, संबंधित कारखान्यांचे अधिकारी तसेच भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी निर्णायक निर्णय...
या बैठकीत प्रमुखतः कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी (PF) आणि सेवानिवृत्ती वेतन यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
PF रक्कम वर्ग करण्याच्या सूचना:
संबंधित साखर कारखान्यांनी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्वरित त्यांच्या खात्यात वर्ग करावी, अशा स्पष्ट सूचना खासदार डॉ. कल्याण काळे यांनी दिल्या.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन:
साखर कारखान्यातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन प्रस्ताव त्वरित मंजूर करून त्यांना पेन्शन लागू करावी.
PF खात्यात जमा रक्कम त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश:
कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांच्या PF खात्यातील जमा असलेली रक्कम त्वरित उपलब्ध करून द्यावी.
यु ए एन (UAN) नंबर ऑनलाईन करण्यास गती:
ज्या कर्मचाऱ्यांचे UAN नंबर अद्याप ऑनलाईन झाले नाहीत, त्यांचे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून UAN नंबर प्रदान करावा आणि त्यांच्या थकीत रकमा त्वरित अदा कराव्यात.
पेन्शनसाठी अर्ज करण्याचे आवाहन:
ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप पेन्शनसाठी अर्ज केला नाही, त्यांनी त्वरित संबंधित साखर कारखान्यांकडे अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले.
सिद्धेश्वर, संत एकनाथ आणि देवगिरी साखर कारखान्यांचा समावेश
या सभेत सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, सिल्लोड, संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, पैठण आणि देवगिरी सहकारी साखर कारखाना, फुलंब्री या तिन्ही साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या PF संबंधित अडचणी यावर सविस्तर चर्चा झाली. या तीनही कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या रक्कमा आणि पेन्शन लाभ मिळावे यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी ठाम भूमिका
ही बैठक कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी अर्ज करावेत आणि प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली. खासदार डॉ. कल्याण काळे साहेब यांच्या पुढाकाराने साखर कारखान्यातील कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या आर्थिक हक्कांची पूर्तता मिळणार आहे, ही बाब अत्यंत दिलासादायक आहे.
What's Your Reaction?






