दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखारांना पोलिसांनी केले जेरबंद....!

 0
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखारांना पोलिसांनी केले जेरबंद....!

छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) घातक शस्त्र व दरोडा टाकण्याचे साहित्य घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. मागिल काहि दिवसांपासून पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरी, दरोड्याच्या घटनेत वाढ होत असल्याने शहरवाशीयांची झोप उडाली होती. दरोडा व चोरी करणा-यांचा शोध घेत असताना साहित्यासह दरोडेखोरांची टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. सपना मॅट कंपनी एमआयडिसी चिकलठाणा येथून शिंदीबनकडे जाणारे रोडवर अंधारामध्ये पाच ते सहा इसम दबा धरुन स्वत:चे अस्तित्व लपवून बसलेले व त्यांच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्याने नमूद इसमांना ताब्यात घेण्यासाठी छापा मारला असता पाच इसमांपैकी दोन इसम अंधारात पळून गेले. त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळुन आले नाही. ताब्यात घेतलेले इसम नामें निलेश बबनराव लोखंडे, वय 27 वर्षे , राहणार हनुमाननगर गं.नं.4, छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), अर्जुन सौरभ साळवे, वय 20, रा.भारतनगर, गजानन माणिकराव साळुंखे, वय 20, रा.हनुमाननगर, ग.नं.1 हे मिळून आले. त्यांच्या ताब्यातून कोयता, धारदार चाकू, तिश्न व धारदार वाघनख्या टाईप हत्यार, मिरची पुड, दोरी, एक मोटार सायकल जिचे दोन्ही नंबर वर चिखल लावून नंबर झाकलेल्या स्थितीत मिळून आली तसेच इसमांचे ताब्यात चार मोबाईल हॅण्डसेट मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले. तसेच पळून गेलेल्या त्यांचे साथीदाराचे नाव अल्ताफ शेख, मनोज कांबळे असे असल्याचे सांगितले. तसेच यातील गजानन माणिकराव साळुंखे हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे. सदर इसम हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना मिळून आल्याने त्यांच्या विरुध्द पोलिस ठाणे एमआयडिसी सिडको येथे गु.नं.307/2025 कलम 310(4),310(5) भा.न्या.सं.सह कलम 4,25 भा.ह.का. सह कर कर 135 मपोका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सपोनि कैलास लहाने करत आहे. त्यांनी आरोपिंना कोर्टात हजर केले असता 22 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना गुन्हा करण्यापुर्वीच ताब्यात घेऊन त्यांच्या विरूध्द ठोस कार्यवाही करण्यात आली आहे. 

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त प्रविण पवार, पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलिस आयुक्त सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडिसी सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सपोनि भरत पाचोळे, कैलास लहाने, पोह हैदर शेख, संतोष सोनवणे, गणेश डोईफोडे, पोअं संतोष गायकवाड, प्रकाश सोनवणे, केवलसिंग घुसिंगे, योगेश म्हस्के, लखसिंग डोबाळ, हरसिंग बोहरा यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow