अंमली पदार्थ प्रतिबंध पथकाकडून नशेच्या 700 गोळ्या जप्त, दोन आरोपी अटक

अंमली पदार्थ प्रतिबंध पथकाकडून नशेच्या 700 गोळ्या जप्त....
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज), अंमली पदार्थ प्रतिबंध पथकाने जवाहरनगर पोलिस ठाणे हद्दीत शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ घंटा गाडीच्या पार्किंग जवळून दोन इसम नशेच्या औषधी गोळ्यांची विक्री करण्याकरीता येणार आहे अशी गुप्त बातमीमार्फत मिळालेल्या माहितीवरुन याठिकाणी पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने छापा टाकला असता कान्हा उर्फ कृष्णा अण्णा लष्करे, वय 25 वर्ष राहणार शिवाजीनगर, पाणी टाकीजवळ, समाधान महादेव उंबासे, वय 23, राहणार हिमालया रेसीडेन्सी, खडी रोड बीड बायपास यांच्या ताब्यातून मानवी जीवितास अपायकारक व हानिकारक अशा गुंगीकारक नशेच्या Nitrosun-10 या एकूण 700 औषधी गोळ्या, एक काॅलेज बॅग अशी एकूण 5070 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच आरोपी सदरचा माल हा परराज्यातील मेडिकल स्टाॅकिस्ट कडून रेल्वेच्या पार्सल द्वारे मागवत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपिविरुध्द जवाहरनगर पोलिस स्टेशन येथे NDPS Act प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कार्यवाही पोलिस आयुक्त प्रविण पवार, पोलिस उपायुक्त(गुन्हे), सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे, पोउपनि अमोल म्हस्के, पोह लाल खान पठाण, पोअ संदीपान धर्म, सतिष जाधव, विजय त्रिभुवन, नितेश सुंदर्डे, महेश उगले, मपोअं जया लांडगे, तेलोरे, ज्योती मोरे सर्व नेमणूक अंमली पदार्थ प्रतिबंध शाखा यांच्या पथकाने केली आहे.
अंमली पदार्थ प्रतिबंध शाखा करीता खास मोबाईल क्रमांक 9529019061 हा देण्यात आला आहे. त्यावर शहरात कोठेही अंमली पदार्थ विक्री करताना किंवा नशा करताना कोणी इसम किंवा नशाखोरी करणा-या टोळ्या आढळून आल्यास व्हाटसअप द्वारे मॅसेज करुन नागरीक माहिती देवू शकतात. माहिती देणा-याचे नाव हे गोपनिय ठेवण्यात येईल व चांगली बातमी देणा-यास योग्य बक्षिस देण्यात येईल असे आवाहन अंमली पदार्थ प्रतिबंध पथकाकडून करण्यात आले आहे.
What's Your Reaction?






