शहरातील एका अल्पवयीन मुलीला विकले दिड लाखात, मुलीला पोलिसांच्या मदतीने सुखरूप आणण्यासाठी एमआयएमच्या टिमला यश...!
मध्य प्रदेशात दिड लाखात विकले मुलीला, परत आणण्यासाठी एमआयएमच्या टिमला यश, इम्तियाज जलील यांची माहिती
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.14(डि-24 न्यूज) मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील मोरका गावात शहरातील एक अल्पवयीन मुलीला औरंगाबाद रेल्वे स्टेशनावरुन एक महीला व पुरुषाने पाण्यात गुंगीचे औषध देऊन पळवून नेत त्या मुलीला अगोदर मुंबईत नेले तेथून एक महीला सोबत घेऊन तेथे दिड लाखात विक्री केली. त्या मुलीला सुखरूप परत आणण्यासाठी बेगमपुरा पोलिसांच्या मदतीने एमआयएमच्या टीमला यश मिळाले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी देत चिंता व्यक्त केली आहे.
त्यांनी या मुलीला चक्क माध्यमांसमोर आणले. त्या मुलीने आपबिती सांगितली.
त्या मुलीला आणण्यासाठी एमआयएमचे सोहेल सिद्दीकी यांच्या टिमला दोन महीने रात्र दिवस प्रयत्न करावे लागले. इम्तियाज जलील यांनी सांगितले या मुलीला मारहाण करण्यात आली. तेथे एका मंदिराच्या खोलीत डांबून ठेवण्यात आले विना अन्नपाणी विना ठेवले गेले. बाहेर जाण्याची परवानगी नाही. या मुलीला पळवणारे पुण्यातील पती पत्नी, व ज्यांनी खरेदी केली त्यांचे छायाचित्र आमच्याकडे आहे. तीचे नाव बदलून आधार कार्डही बणवण्यात आले आहे. त्या मुलीला कुटुंबाची आठवण येवू नये यासाठी पाण्यात नशेची वस्तू दिली जायची. हिंदू रितीरिवाज नुसार त्या मुलीचे लग्न तेथील युवकाशी लावले. हातात धागे बांधले. तीला नशा करण्याची सवय लावली गेली. त्या मुलीने कसेतरी वडीलांचा मोबाईल क्रमांकावर फोन केला. घरची परिस्थिती गरीबीची, भाऊ निघाला त्या गावाकडे, एमआयएमच्या टिमशी संपर्क केला. मीही तीच्या भावाला भेटलो. संपर्कात राहून सहकार्य केले. बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेथील पोलिसांना संपर्क केला. 13 मे रोजी रागाच्या भरात परभणी साठी नातेवाईकांकडे निघालेली मुलगी या रैकेटमुळे पोहोचली मध्य प्रदेशात. कशीतरी त्या मुलीला बेगमपुरा पोलिसांच्या मदतीने 27 जूलै रोजी तावडीतून सुटका केली. अशा प्रकारे बेपत्ता होणा-या तरुणींच्या तपासात पोलिसांनी गंभीरता घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
मोरकी गावातील रेड लाइट एरियात महाराष्ट्रातील 70 टक्के मुली आहेत. विक्रीचा हा मोठा रैकेट आहे. बेपत्ता मुलींना त्यांच्या कुटुंबात सुखरूप सोडवण्याची गरज आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील हजारो मुली बेपत्ता आहेत. रैकेटची चौकशी करण्यासाठी सरकारने स्पेशल टास्क फोर्स पोलिसांच्या सहभागाने तयार करावे. लाडकी बहीण योजना सुरू केली या आपल्या बहीणी नाहीत का...असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला आहे. अनेक मुलींना वाम मार्गाला लावले जात असल्याचा गोरखधंदा सुरू आहे याला कोठेतरी थांबवले पाहिजे यासाठी समाजाने जागृत राहून आपल्या मुलींकडे लक्ष देण्याची गरज आहे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. त्या बुरखाधारी मुलीला कसा त्रास देण्यात आला याची माहिती त्या मुलीने माध्यमांसमोर सांगितले. तीची पहेली फोटो व आत्ताच्या फोटोत फार फरक दिसून येतो अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नासेर सिद्दीकी व अब्दुल समीर साजिद बिल्डर यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?