वक्फ जागेची भाडेवाढ, आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय स्टेडियम बणवण्यासाठी वक्फ बोर्डाची मान्यता
वक्फ जागेची भाडेवाढ, आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय स्टेडियम बणवण्यासाठी वक्फ बोर्डाची मान्यता
नवीन चेअरमन समीर काजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय... आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम बणवण्यासाठी दिली मान्यता, शंभर कोटीत बनणार स्टेडियम, मालकी वक्फ बोर्डाची असेल, स्टेडियम साठी तांत्रिक अडचणी सोडवले जातील, घटस्फोटीत महिला, अनाथ बालकांना पेंशन, पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना रिसर्च करण्यासाठी स्काॅलर्शिप देणार, सहा महीन्यात रिक्त पदे भरण्यात येणार...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.14(डि-24 न्यूज) 5 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या चेअरमन पदाची नियुक्ती झाल्यानंतर समीर काजी यांनी आज शहरात वक्फ बोर्डाची बैठक घेतली यामध्ये त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचे पत्रकात परिषदेत माहिती दिली.
त्यांनी सांगितले वक्फ बोर्डाच्या आमखास मैदानावर शासनाच्या वतीने शंभर कोटी निधीत आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम बनवले जाणार आहे. या स्टेडियमच्या कामाला आजच्या बोर्डाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हे स्टेडियम शासन बनवत असले तरी मालकी वक्फ बोर्डाची असणार आहे. हा वक्फ बोर्डाचा ड्रीम प्रोजेक्ट असणार आहे. सन 1995 अगोदर जे भाडेकरू वक्फ बोर्डाच्या जागेवर आहे त्यांचे नवीन लिजनुसार भाडे वाढणार आहे. जिल्हा वक्फ अधिकारी त्या भाडेकरुंना प्रस्ताव पाठवतील त्यांनी पंधरा दिवसांत उत्तर द्यावे नसता 54, 52A नुसार वक्फ बोर्ड संबंधितांवर कारवाई करणार आहे. वक्फ बोर्डाच्या वतीने 60 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने खर्च वाढल्याने उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. रेकॉर्ड, नोंदणी, स्कीम व चेंज रिपोर्टची कामे आता ऑनलाईन करावी लागणार आहे. प्रमाणपत्र पंधरा दिवसांत ऑनलाईन मिळेल औरंगाबादच्या मुख्य कार्यालयात येण्याची संबंधितांना गरज असणार नाही. जिल्हा वक्फ अधिकारी यांनी अर्ज आल्याच्या पंधरा दिवसांत वक्फ बोर्डात अहवाल सादर करणे आता बंधनकारक असणार आहे. अहवाल दिला नाही तर कारणे दाखवा नोटीस बजावणार. वक्फ बोर्डाच्या जागेवर अवैध अतिक्रमण काढण्यासाठी कार्यवाही केली जाईल. जे प्रकरणे वक्फ ट्रिब्युनलमध्ये सुरू आहे ते बघण्यासाठी वकिलांची टिम नियुक्ती करणार. घटस्फोटीत महिला, अनाथ मुले यांना पेन्शन, पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना रिसर्च करण्यासाठी स्काॅलर्शिप देणार आहे यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली जाईल यासाठी वक्फ अकाऊंट उघडले जाईल जे दानशूर व्यक्ती मदत करण्यासाठी इच्छुक असतील ते मदत करु शकतात. कामात पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा वक्फ बोर्डाच्या कार्यालयात सिसिटीव्ही, बायोमेट्रिक बसवणार. शासनाने 169 पदे भरण्यासाठी मान्यता दिली आहे त्यापैकी 60 पदे भरली आहे उर्वरित पदे सहा महीन्यात भरली जातील अशी माहिती पत्रकार परिषदेत चेअरमन समीर काजी यांनी दिली आहे.
यामुळे वक्फ बोर्डाचे सदस्य आमदार फारुख शहा , डॉ.मुदस्सर लांबे, हसनैन शाकेर, मौलाना अथर अली, मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद जुनेद, डिप्टी सिईओ मुशीर अहेमद शेख यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?