आमदार रवी राणाच्या विरोधात महीला काँग्रेस रस्त्यावर, क्रांतीचौकात केली निदर्शने
आमदार रवी राणा सह महायुती विरोधात शहर महिला काँग्रेसचे निदर्शने
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.14(डि-24 न्यूज) आम्हाला मतदान न केल्याने लाडकी बहीण योजना देण्यात येणारी रक्कम परत घेण्याची धमकी आमदार रवी राणा यांनी दिल्याचा निषेध शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने केला क्रांती चौक येथे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने रवी राणा मुर्दाबाद, महायुती सरकार मुर्दाबाद, महायुती सरकार मुर्दाबाद ,"महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचा अपमान करणाऱ्या रवी रानाचे करायचे काय... अशा घोषणात तीव्र निर्देशन करण्यात आली. सदरील निर्देशन हे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिपाली मिसाळ यांच्या नेतृत्वात घेण्यात आले.
यावेळी माजी शहराध्यक्ष इब्राहिम पठाण, इक्बाल सिंग गिल, काँग्रेस प्रवक्ता डॉ. पवन डोंगरे, जिल्हा महिला अध्यक्ष दीक्षा पवार, प्रदेश महिला सचिव मीनाक्षी देशपांडे, सुरेखा पानखडे सरोज मसलगे, सीमा थोरात, असंघटित महिला जिल्हाध्यक्ष शीला मगरे, रुबीना सय्यद ,रेहाना शेख कासिम, विद्या लांडगे, सचिन शिरसाट, प्रशांत शिंदे, युवक शहराध्यक्ष सागर नागरे, अनुराग दाभाडे, उषा पगारे, समीना सय्यद, प्रवीण केदार, नदीम सौदागर, उत्तम दणके, संकेत साळवे, विशाल अभंग, रोशन खरात, शुभम मस्के, नितीन मिसाळ सहित शेकडो महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
रवी राणा यांनी महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींची माफी मागावी अन्यथा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने तोंडाला काळा फासण्यात येईल. अशी मागणी शहरजिल्हा महिला अध्यक्ष दिपाली मिसाळ यांनी केली.
What's Your Reaction?