फडणवीस पिकविमा पॅटर्न चालणार नाही, जुन्याच पिकविम्याची अंमलबजावणी करा - हर्षवर्धन सपकाळ

 0
फडणवीस पिकविमा पॅटर्न चालणार नाही, जुन्याच पिकविम्याची अंमलबजावणी करा - हर्षवर्धन सपकाळ

बीड विमा पॅटर्न फेल झाला आता फडणवीस विमा पॉटर्न चालणार नाही, काँग्रेस गप्प बसणार नाही - हर्षवर्धन सपकाळ 

जुन्याच पिकविमा योजनेची अंमलबजावणी करा...राज्य सरकारच्या धोरणावर केला हल्लाबोल 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) 1 रुपयात पिकविमा देण्याची योजना बंद करून, नवीन पीक कापणी आणि उंबरठा पद्धतीची योजना लागू करण्याचा राज्य मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांना, विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. राज्य शासनाने जुन्याच पिकविमा योजनेची अंमलबजावणी करावी, अन्यथा कॉग्रेस पक्षातर्फे राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत दिला.

बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) तील सुभेदारी विश्रामगृहावर माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले, राज्यात भाजपप्रणित महायुती सरकार मनमानी पद्धतीने कारभार करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांविरोधात निर्णय घेत आहेत. शेतकऱ्यांसाठी 1 रुपयांमध्ये पीक विमा योजना बंद करून, या सरकारने आता नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत आहे. एक रुपयामध्ये पिकांना विमा कवच मिळत होते. राज्य सरकारने हि पिकविमा योजना रद्द केल्याने त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी मंत्री अनिल पटेल, इब्राहीम पठाण, जगन्नाथ काळे, किरण पाटील डोणगावकर, डॉ. पवन डोंगरे, महिला जिल्हाध्यक्षा दीक्षा पवार, महिला शहराध्यक्षा दिपाली मिसाळ, अ­ॅड. सय्यद अक्रम, कैसर बाबा, अ­ॅड. इकबालसिंग गिल आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow