मान्सूनपूर्व नालेसफाई, नागरीकांच्या तक्रारी असतील तर नियंत्रण कक्षाला फोन करा...

मान्सूनपूर्व नालेसफाई, नागरीकांच्या तक्रारी असतील तर नियंत्रण कक्षाला फोन करा...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) शहरातील मान्सूनपुर्व नालेसफाईचे काम महानगरपालिकेमार्फत 1 एप्रिल पासून सुरु आहे. त्याकरीता यांत्रिकी विभागाद्वारे जेसीबी मशिन्स, पोकलेन मशिन्स, टिप्पर्स, टॅक्टर्स इत्यादी वाहने यंत्रसामुग्री प्रत्येक झोन कार्यालयांना देण्यात आलेले आहे. सदरील मशिनरी वार्ड अभियंता यांच्या अधिपत्याखाली नाले सफाईचे काम करत आहेत. सद्यस्थितीत नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून काही ठिकाणी मलबा उचलण्याचे व दुबार सफाईचे काम सुरु आहे.
आयुक्त तथा प्रशासक जी.श्रीकांत यांच्या आदेशान्वये ज्या ठिकाणच्या नालेसफाई बाबत नागरीकांच्या काही तक्रारी असतील तर त्यावर तात्काळ कार्यवाही होण्याच्या दृष्टिने यांत्रिकी विभाग मार्फत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तरी ज्या ठिकाणी नालेसफाई व्यवस्थित झाली नाही किंवा नाल्याचे मटेरियल उचलणे बाकी आहे किंवा अर्धवट नालेसफाई झाली आहे अशा तक्रारी असतील तर नागरीकांनी 7 जून पर्यंत मोबाईल क्रं. 8551058080 वर नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा असे आवाहन कार्यकारी अभियंता(यांत्रिकी) अमोल कुलकर्णी यांनी केले आहे.
What's Your Reaction?






