नांदेडमध्ये 38 जनावरे पकडल्याने खळबळ, 14 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे दाखल

नांदेडमध्ये 38 जनावरे पकडल्याने खळबळ, 14 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे दाखल...
नांदेड, दि.31(डि-24 न्यूज) नांदेड पोलिसांनी 30 मे पहाटे व आज कार्यवाही करत एकूण 38 जनावरे(गोवंश) पकडल्याने खळबळ उडाली आहे. हि जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आल्याने हि कार्यवाही करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कार्यवाहीत पोलिसांनी एकूण 14 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे.
कायदेशीर कार्यवाही केल्यानंतर हि जनावरे सुखरुप गोशाळेत सोडली जाणार आहे. नांदेड ग्रामिण, इतवारा पोलिस ठाणे, विमानतळ पोलिस ठाणे असे एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये गुर नं. 522/2025, कलम 5(ब), 9 प्राणी संरक्षण(सुधारणा) अधिनियम 1976, सहकलम 11 प्राण्यांना क्रुरतेने वागवण्याचा प्रतिबंध अधिनियम 1960, पोलिस स्टेशन इतवारा पोलिस ठाणे, गुर नं.181/2025 हिच कलम, पोस्टे इतवारा गुरनं 182/2025, तीच कलमे, पोस्टे विमानतळ गुरनं. 211/2025 कलम 5(अ),5(ब),9 प्राणी संरक्षण(सुधारणा) अधिनियम सहकलम 3,11(घ),(ड) प्राण्यांना क्रुरतेने वागवण्याचा अधि. 1960 नुसार चार गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल केले आहे.
सदरील कार्यवाई पोलिस अधिक्षक अविनाश कुमार, अपर पोलिस अधिक्षक खंडेराय धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायक, इतवारा पोलिस ठाणे, पोलिस निरीक्षक नांदेड ग्रामिण ओमकांत चिंचोलकर, रंजित भोईटे इतवारा पोलिस स्टेशन, गणेश चव्हाण, विमानतळ पोलिस स्टेशन, पोउपनि ज्ञानेश्वर मटवाड, बाबुराव चौव्हाण, रमेश गायकवाड, पंकज इंगळे, प्रविण साखरे, पोहेकाॅ. दारासिंग राठोड, तेलंगे, दौलत ताटे, संतोष राणे, मेकाले, कलंदर, वाजिद, श्रीराम दासरे, जगताप, जावेद, विष्णू कल्याणकर, रामदास आवळे, संतोष पवार, राजेश माने, शेख सोहेल, अर्जुन मुंढे यांनी केली आहे.
What's Your Reaction?






