धुळे-सोलापूर हायवे बायपासवर ईरटिगा - मोटारसायकलचा भिषण अपघात, तीन जण जागीच ठार...?

 0
धुळे-सोलापूर हायवे बायपासवर ईरटिगा - मोटारसायकलचा भिषण अपघात, तीन जण जागीच ठार...?

धुळे-सोलापूर बायपासवर ईरटिगा-मोटारसायकलचा भिषण अपघात, तीन जण ठार...?

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) आज मंगळवारी रात्री 8 ते 8.30 वाजेच्या दरम्यान धुळे सोलापूर हायवे बीड बायपास रोडवरील हाॅटेल पल्लवी कट पाॅईंट समोर धुळे बाजूला जाणाऱ्या मोटारसायकल होंडा शाईन(क्रमांक MH-20, HG-0142) ला चारचाकी ईरटिगा(क्रमांक MH-20, GY-9664) जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात मोटारसायकल सवार तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

या घटनेत शेख रफीक शेख गफूर, राहणार सईदा काॅलनी, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), शेख मोईन, राहणार जीन्सी, शेख आदीब शेख अन्वर हे (चिकन सप्लायर) मयत झाले आहे. मयतांची ओळख पटली आहे त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली आहे. रुग्णवाहिकेत तीनही इसमांना घाटी रुग्णालयात पाठवले आहे. ईरटिगा चालकास चिकलठाणा पोलिस ठाण्यात कार्यवाहीसाठी आणले आहे. ईरटिगा गाडीतील जखमींना मिनी घाटी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

घटनास्थळी पोलिस उप अधीक्षक पुजा नागरे, चिकलठाणा पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे, पोलिस उपनिरीक्षक उत्तम नागरगोजे यांनी धाव घेतली. पुढील कारवाई चिकलठाणा पोलिस करत आ

हे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow