महापालिकेतील सर्व जागांवर मनसेची जोरदार तयारी - जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर

 0
महापालिकेतील सर्व जागांवर मनसेची जोरदार तयारी - जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर

महापालिकेतील सर्व जागांवर मनसेची जोरदार तयारी – जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांची घोषणा...

संभाजीनगर(औरंगाबाद) दि.6(डि-24 न्यूज) :- महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद )महापालिकेतील सर्व जागा ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर शहरात मनसेचे कार्यकर्ते प्रत्येक विभागात सक्रीय असून, पक्षाच्या शाखा जोरात काम करत आहेत. शहरातील पाणी, रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर इतर पक्षांच्या तुलनेत अधिक ठामपणे आवाज उठवत मनसेने जनतेच्या हितासाठी लढा दिला आहे.

कोरोना काळातही मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर होते. या सगळ्या कामांची पावती शहरातील जनतेने वेळोवेळी दिली असून, आता मनसे महापालिका निवडणुकीसाठी जोमात उतरणार आहे.

"शहरवासीयांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचे कष्ट या बळावर निश्चितच मनसेला मोठा विजय मिळेल," असा विश्वास खांबेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow