गोवंश हत्या केल्यास मकोका लागणार, बोकड्यांची कुर्बाणी करणार मुस्लिम समाज...!

 0
गोवंश हत्या केल्यास मकोका लागणार, बोकड्यांची कुर्बाणी करणार मुस्लिम समाज...!

गोवंश हत्या केल्यास मकोका लागणार, बोकड्यांची कुर्बाणी करणार मुस्लिम समाज...!

छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) महाराष्ट्रात राज्य सरकारने गोहत्या बंदी नंतर गोवंश हत्या केल्यास दोषींवर मकोका कायद्यानुसार कार्यवाही करण्याचा निर्णय घेतल्याने मुस्लिम समाजाच्या जून महीन्यात होणा-या कुर्बानीच्या सणावर याचा परिणाम होणार आहे. इस्लाम धर्माच्या शिकवणीनुसार ईद-उल-अजहाच्या दिवशी ईदच्या नमाज पठणानंतर जनावरांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे परंतु सरकारने गोवंश हत्या बंदीचा कायदा आणल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने बोकड्यांची कुर्बानी देण्याचा निर्णय घेतला असल्याने शेतक-यांच्या आर्थिक उत्पन्नावर यांचा परिणाम होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोवंश हत्या करणा-या विरुध्द मकोका अंतर्गत कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस विभागाला दिले आहे.

आज ऐतेहासिक जनावरांच्या बाजारात खरेदीसाठी बोकडे खरेदीसाठी ग्राहकांचा कल दिसून आला.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी जलिस अहेमद यांनी मुस्लिम समाजाला बोकड्यांची कुर्बानी करण्याचे आवाहन केले. सरकारने जो गोवंश हत्याबंदीचा कायदा आणला आहे त्याचे पालन करावे. गोवंश खरेदी करु नये. यामुळे नाहक त्रास सणाच्या दिवशी करावा लागतो. केसेस होतात. पोलिस कार्यवाहीसाठी घरापर्यंत येतात. जनावरे जप्तीची कार्यवाही होते. त्यामुळे तणाव वाढण्याची भीती असते. म्हणून प्रशासनाला सहकार्य करावे. काही दिवसांनंतर बोकड्यांचे दर कमी होतील त्यावेळी खरेदी करावी. कायद्याचे उल्लंघन केल्यास मकोका कायद्यानुसार कार्यवाही होणार आहे. या केसमध्ये गुन्हा सिध्द झाल्यास पाच ते सहा वर्षे शिक्षा किंवा आजिवन कारावास होऊ शकतो. या केसमध्ये जमानत मिळणार नाही असे प्रावधान आहे. 

छावणीच्या जनावरांच्या बाजारात माहिती घेतली असता बोकड्यांचे दर वाढलेले होते. 20 हजार पासून एक लाखापर्यंत बोकडे विक्रीसाठी शेतकरी व व्यापा-यांनी आणले होते. गावरान, सोजात, जमना पारी, वंडम, जीन्स विविध जातींचे बोकडे बाजारात विक्रीसाठी आले होते.

 गोवंश कायद्यामुळे बोकडे खरेदीसाठी खरेदीदारांची गर्दी दिसून आली. यावेळी शेकडो बोकड्यांची विक्री झाली. बाजाराची 30 ते 40 रुपयांची पावती भरुन खरेदीदार बोकड्या घरी घेऊन जात होते. शहरातील विविध ठिकाणी बोकडे खरेदी विक्रीसाठी बाजार सजणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow