काँग्रेसच्या तिरंगा यात्रेने शहराचे लक्ष वेधले, सैन्याचे कामगिरीचे केले कौतुक...

भारतीय सैन्यदलाच्या सन्मानार्थ शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे तिरंगा यात्रा व स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिन निमित्त अभिवादन....
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)
जम्मू कश्मिर येथील पहलगाम सारख्या भ्याड हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यदलाने केलेल्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी, ऑपरेशन सिंदूर मधील शूरवीर जवानांच्या सन्मानार्थ शहिदांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या तिरंगा रैलीने शहराचे लक्ष वेधले. तिरंगा यात्रा 9:30 वा. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरूवात झाली - शहागंज - चेलीपुरा - अण्णाभाऊ साठे चौक मार्गे - माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांचा स्मृति दिन तसेच राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिनानिमित्त त्यांच्या दिल्ली गेट जवळील पूर्णाकृती पुतळ्या जवळ अभिवादनाने संपन्न झाली. यावेळी मोठ्या प्रमाणावर फलक, तिरंगे झेंडे घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय हिंद व याद करो कुर्बानी या संकल्पनेवर आधारित तिरंगा यात्रा आहे व भारतीय सैनिकांच्या मागे काँग्रेस पक्ष नेहमी ठाम पणे उभा आहे, असे मत यावेळी पदयात्रेत शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांनी व्यक्त केले.
यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, माजी मंत्री अनिल पटेल, प्रकाश मुगदिया, डॉ. जितेंद्र देहाडे, जिल्हा बँक उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, जग्गनाथ काळे, रवींद्र काळे, कांचनकुमार चाटे, भाऊसाहेब जगताप, सय्यद अक्रम, अतिश पितळे, शेख अथर, अनिस पटेल, कैसर बाबा, संघठन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, डॉ. निलेश आंबेवाडीकर, मोईन इनामदार, राहुल मते, शफिक शहा, राहुल सावंत, संदीप बोरसे, शेख रईस, बाबुराव कवसकर, डॉ. अरुण शिरसाठ, डॉ. योगेश बहादुरे, मोईन कूरेशी, डॉ. पवन डोंगरे, जयप्रकाश नारनवरे, कल्याण चव्हाण, निमेश पटेल, सय्यद फय्याजोद्दीन, नदीम सौदागर, साजेद कुरेशी, असदुल्ला शेख, पप्पूराज ठुबे, संतोष दीडवाले, अनिता भांडरी, चंद्रप्रभा खंदारे, सरोज जेकब, दिपाली मिसाळ, दिक्षा पवार, शिरीष चव्हाण, एकनाथ त्रिभुवन, मोहम्मद जाकीर, शेख इम्रान, जाफर खान, सूर्यकांत गरड, आबेद जहागीरदार, योगेश थोरात, शाहूराज कांबळे, शेख अब्बास, मुद्दस्सीर अन्सारी, शेख शब्बीर, मजाज खान यांच्यासह मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






