सरसकट कर्जमुक्तीसाठी शिवसेनेची मराठवाडाव्यापी "बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली"

 0
सरसकट कर्जमुक्तीसाठी शिवसेनेची मराठवाडाव्यापी "बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली"

सरसकट कर्जमुक्तीसाठी शिवसेनेची मराठवाडाव्यापी ‘बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली’...

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक...

छत्रपती संभाजीनगर, दि.14(डि-24 न्यूज)- : शिवसेना नेते - राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांच्या संयोजकतेखाली मराठवाडाभर शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ‘बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली’ चे आयोजन करण्यात आले आहे. "नको अटी - नको शर्ती, आम्हाला द्या संपूर्ण कर्जमुक्ती" या घोषवाक्याखाली मंगळवार, 16 जून रोजी सकाळी 10 वाजता मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर ही रॅली काढण्यात येणार आहे.

राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला असून कर्जबाजारीपणा, पिकांना मिळणारा कमी दर, खतांचा तुटवडा, अपुरा वीजपुरवठा आणि विमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसासाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही धडक ट्रॅक्टर रॅली आयोजित करण्यात आली आहे.

या ट्रॅक्टर रॅलीमध्ये शिवसैनिक, पक्षाचे पदाधिकारी, सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, सुनील काटमोरे, परशुराम जाधव, रोहिदास चव्हाण, बबनराव थोरात, प्रदीपकुमार खोपडे, खासदार संजय जाधव, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार कैलास पाटील, आमदार राहुल पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, महेश नळगे, गणेश वरेकर, उल्हास गिराम, रणजीत पाटील, बालाजी रेड्डी, बबन बारसे, भुजंग पाटील, ज्योतिबा खराटे, संदेश देशमुख आणि गोपू पाटील यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow