महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांची बदली, नवीन आयुक्त म्हणून अमोल येडगे पदभार स्वीकारणार...!
मनपा आयुक्त जी श्रीकांत यांची बदली, नवीन आयुक्त म्हणून अमोल येडगे पदभार स्वीकारणार...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) - शहरातील 5 हजार हुन अतिक्रमण पाडणारे धाडसी महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांची अखेर चार वर्षांनंतर बदलीची ऑर्डर धडकली. त्यांची बदली मुंबईत जलजीवन मिशनचे संचालक म्हणून या पदावर रुजू होतील.
त्यांच्या जागी कोल्हापूरचे युवा जिल्हाधिकारी अमोल येडगे छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. जी. श्रीकांत यांनी आपल्या चार वर्षांच्या प्रशासक पदाच्या कार्यकाळात अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास नेले, कर वसूलीत वाढ केली, नवीन कर्मचारी भरती त्यांच्या कार्यकाळात झाली, भव्य अतिक्रमण मोहीम राबवून डिपी रस्ते मोकळे केले. शहर कचरामुक्त करण्यासाठी स्वच्छ शहर ग्रीन शहर करण्याची प्रयत्न केला. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या. महापालिका शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण गरीब विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी सिबीएससी पॅटर्न सुरू केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी खेळ स्पर्धा व विविध योजना त्यांच्या कार्यकाळात राबवली. करमध्ये सवलत योजना सुरू केली. महापालिका निवडणूक त्यांच्या कार्यकाळात शांततेत पार पडली. एक कर्तव्यदक्ष अधिकारी व अक्रामक अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.
What's Your Reaction?