इंधन बचतीसाठी अनिल मकरिये यांचा पुढाकार, ईव्ही कारचा वापर सुरू...

 0
इंधन बचतीसाठी अनिल मकरिये यांचा पुढाकार, ईव्ही कारचा वापर सुरू...

इंधन बचतीसाठी स्थायी समिती सभापती अनिल मकरीये यांचा पुढाकार; ईव्ही कारचा वापर सुरू...

छत्रपती संभाजीनगर, दि.16(डि-24 न्यूज)- देशात इंधन बचतीची गरज लक्षात घेऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती श्री अनिल मकरीये यांनी आजपासून इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केला आहे.

देशात डिझेल टंचाईचे संभाव्य सावट लक्षात घेता आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनेही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा काळाची गरज असल्याचे मत श्री मकरीये यांनी व्यक्त केले. आज त्यांनी महापालिकेतील कार्यालयीन कामकाज तसेच विविध ठिकाणांच्या पाहणी दौर्‍यासाठी ईव्ही कारचा वापर करून इंधन बचतीचा संदेश दिला.

यावेळी बोलताना श्री मकरीये यांनी सांगितले की, पारंपरिक इंधनावर अवलंबून राहण्याऐवजी पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे इंधन बचत होण्यास मदत होईलच, शिवाय प्रदूषण कमी करण्यासाठीही हा महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.

शहरातील नागरिकांनीही शक्य तितक्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा तसेच इंधनाची बचत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्री मकरीये यांनी केले. त्यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, इतर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांसाठीही हा आदर्श ठरत

आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow