नीट पेपर लिक प्रकरण, एमआयएम विद्यार्थी संघटना अक्रामक, क्रांती चौकात केले निषेध आंदोलन...
नीट पेपर लिक प्रकरण, एमआयएम विद्यार्थी संघटना अक्रामक, क्रांती चौकात केले निषेध आंदोलन...
छत्रपती संभाजीनगर, दि.16(डि-24 न्यूज)- AIMIM पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी झालेल्या अन्यायाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
नीट पेपर लीक प्रकरणामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनाला माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच विरोधी पक्ष नेते समीर साजिद बिल्डर, नासेर सिद्दीकी, गटनेते हाजी शेर खान, शारेक नक्शबंदी, विद्यार्थी नेते व नगरसेवक डॉ. कुणाल खरात, अब्दुल रेहमान खान, नगरसेवक मुन्शी पटेल, वासिम अहेमद खान, शेख अहमद, मोहम्मद असरार, वाजेद जहागीरदार, मिर वाजेद आली, साबेर शेख, मतीन खान, साबेर पटेल, अमजद खान, नितेश जाधव, संदीप जमधडे, अमजद चाचू, सलीम सहारा, शेख इरशाद, सविता ताई वाघुले, पवन गायकवाड तसेच सर्व नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली व विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहील असे सांगितले.
What's Your Reaction?