आठवलेंनी मोदींचे गुणगान गात म्हणाले एकही जागा मिळाली नाही त्यासाठी काॅम्प्रामाईज केले

 0
आठवलेंनी मोदींचे गुणगान गात म्हणाले एकही जागा मिळाली नाही त्यासाठी काॅम्प्रामाईज केले

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाचा चौफेर विकास... 

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेंकडून गुणगान... 

भाजपचे मिशन 400 पार मात्र आठवले म्हणतात 370 जागा मिळतील... 

औरंगाबाद,दि.21(डि-24 न्यूज) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये देशाचा सर्वांगीण विकास झाला असून सर्वसामान्य जनता भाजप प्रणित सरकारवर खुश आहे असे गुणगान गात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मोदींची आज रविवारी एका पत्रकार परिषदेत जोरदार स्तुती केली.

एवढेच नाही तर एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मिशन 400 पारचा नारा देत असताना आठवले यांनी मात्र 370 जागा मिळतील असा दावा करीत भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले रविवारी एका लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी शहरात आले होते.

 त्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला ते पुढे म्हणाले एकीकडे एनडीए आघाडी आणि दुसरीकडे इंडिया आघाडी आहे मोदींना हरवण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले आहे परंतु ते त्यांना शक्य होणार नाही कारण दहा वर्षाच्या कार्यकाळांमध्ये मोदी सरकारने अनेक योजना राबवल्या आहे. महिला आरक्षणाचा निर्णय घेतला 2029 ला ते लागू होणार आहे यामुळे संसदेत सर्व जाती धर्मातील 180 महीला खासदार लोकसभेत जाणार आहे. काश्मीर मधील 370 कलम हटविले आहे त्यामुळे तेथे दलितांना आरक्षण मिळाले आहे. देशभरातच हायवेचे जाळे विणले असून देशभरातील 80 कोटी जनतेला मोफत धान्य देत आहे. ही योजना पुढील पाच वर्ष लागू असणार आहे. 46 कोटी लोकांना मुद्रा लोन मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप प्रणित एनडीआघाडीला 370 जागा मिळतील. महाराष्ट्रातही 40 हून जास्त जागा मिळतील असा दावा करून श्री आठवले म्हणाले विरोधी आघाडीला फारसे यश मिळणार नाही. एका प्रश्नावर बोलताना श्री आठवले म्हणाले माझा रिपब्लिकन पक्ष देशभरातच पोहोचला आहे. नागालँड मध्ये दोन आमदार आहेत. काही राज्यांत नगरसेवक व विविध ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाने दोन जागा मागितल्या होत्या परंतु त्या मिळाल्या नाही शिर्डीची जागा तरी द्यावी त्यासाठी प्रयत्न केले की ही जागा आमच्या पदरात पडली नाही. कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून रिपाईने चार पावले मागे जाण्याचा निर्णय घेतला. एक जागा जरी नाही मिळाले नाही तरी कॅबिनेट मंत्रीपद आणि विधान परिषद विधानसभेच्या आठ ते दहा जागा मिळतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एकही जागा मिळाली नाही याबाबत पत्रकारांनी प्रश्नाचे सरबत्ती करता श्री. आठवले म्हणाले काही वेळा कॉम्प्रमाईज करावेच लागते त्याशिवाय राजकारणात यशस्वी होऊ शकत नाही. काही पक्षाकडून संविधान बदलले जाईल असा प्रचार केला जात आहे परंतु त्यात अजिबात तथ्य नाही संविधान कोणीही बदलू शकत नाही असेही ते म्हणाले.

 यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, मिलिंद शेळके, ब्रह्मानंद चव्हाण, किशोर थोरात, दौलत खरात, विजय मगरे, लक्ष्मण हिवराळे, संजय ठोकळ आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow