24 एप्रिल रोजी इम्तियाज जलील भरणार उमेदवारी अर्ज, राजश्री शाहू महाराज व उन्मेश पाटील यांना पाठिंबा म्हणजे करण पवारांना पाठिंबा...?
24 एप्रिल रोजी इम्तियाज जलील भरणार उमेदवारी अर्ज, राजश्री शाहू महाराज व उन्मेश पाटील यांना पाठिंबा म्हणजे करण पवारांना पाठिंबा आहे का...?
अमित शाह यांच्यावर इम्तियाज जलील यांनी टिका केली की ते एमआयएमला उखाडून फेकणार होते व कमळ खिळवणार होते आता काय झाले शिंदे गटाला जागा सुटली व उशिरा का होईना उमेदवार जाहीर झाला म्हणून त्यांनी संदीपान भुमरे यांना शुभेच्छा दिल्या... एमआयएमच्या दोन महाविकास आघाडीचे उमेदवार व दोन आंबेडकरांना पाठिंबा दिल्याने धर्मनिरपेक्ष पक्षासोबत असल्याचे दाखवून दिले आहे...
औरंगाबाद, दि.21(डि-24 न्यूज) 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता भडकलगेट येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जुना बाजार मार्गे बुढीलेन ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मिरवणूक काढून आपला उमेदवारी अर्ज कार्यकर्त्यांच्या व विविध जाती धर्मातील लोकांच्या उपस्थितीत दाखल करणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत खासदार इम्तियाज जलील यांनी आज दिली आहे.
पक्षात काही माजी नगरसेवक, नेते प्रचारात येत नाही गुप्त बैठक घेऊन बंड पुकारले आहे या प्रश्नावर जलिल यांनी सांगितले असे काही झाले नाही जे बातम्या वर्तमानपत्रात छापून येत आहे ते ते वाचून मी इन्जाॅय करत आहे. आपल्याला 24 एप्रिल रोजी कळेल सर्व नेते, माजी नगरसेवक, धनगर समाजाचे बांधव पण उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षात बंड नाही असे ते म्हणाले. कोल्हापूर येथून महाविकास आघाडीचे उमेदवार राजश्री शाहू महाराज व जळगाव येथून माजी खासदार उन्मेश पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. परंतु त्यांच्या प्रयत्नांने करण पवार यांना ठाकरे गटाची उमेदवारी मिळाली मग एमआयएमने ठाकरे गटाला पाठिंबा दिला का असा प्रश्न उपस्थित होत आहे. वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना एमआयएमचा जाहीर पाठिंबा आहे त्याबदल्यात आम्ही पाठींबा मागितला नाही. संसदेत दलित खासदार जावे हि पक्षाची भुमिका असल्याने 23 एप्रिल रोजी मी व एमआयएमचे पदाधिकारी कार्यकर्ते आनंदराज आंबेडकर यांच्या प्रचारासाठी जाणार आहे. ताज रेसीडेन्सीच्या बाजूला खुल्या मैदानावर एमआयएमचे सेंट्रल प्रचार कार्यालय असणार आहे.
अवैध गुटखा विक्री व बटन विक्री आपल्या काळात वाढली आहे याबद्दल त्यांनी उत्तर दिले कारवाई व्हावी व अवैध धंदे बंद करण्यासाठी अनेकदा प्रश्न उपस्थित केला त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस, माध्यमे व जनतेचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यावर विविध जनहिताचे आंदोलन केल्याने 12 गुन्हे दाखल आहेत. त्यामधील 7 मध्ये सुटका झाली पाच केसेस सुरू आहे. शहागंज येथील दारुची दुकान बंद करण्यासाठी आंदोलन केले होते. लाॅकडाऊनमध्ये गरीबांची दुकाने बंद ठेवून व्यवसायावर परिणाम होत होता मनमानी आदेश प्रशासनाकडून दिले जात होते त्याविरोधात आंदोलन केले. लाॅकडाऊनच्या काळात दुकाने वेळ दिलेल्याचा पालन केले नसल्याने लाखो रुपये दंड व्यापा-यांना लावण्यात आले होते. कामगार उपायुक्त यांच्याकडे दंड कमी करण्याची मागणी व्यापा-यांना सोबत घेऊन घेराव घातला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आदर्श पतसंस्थेतील घोटाळयात हजारो लोकांचे पैसे अडकलेले आहेत त्यांना हक्काचे पैसे गुंतवणूकदारांना मिळवून देण्यासाठी आंदोलन केले कायदा हातात घेतला नाही तरीही गुंतवणूकदार व माझे कार्यकर्ते व माझ्यावर दोन गुन्हे दाखल केले. स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी येथे मंजूर असताना पुण्यात पळविण्यात आली त्याविरोधात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून विरोध केला गुन्हा दाखल करण्यात आला. असे 12 गुन्हे दाखल आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर हा उमेदवार तर क्रीमीनल आहे अशी अफवा उडवली जाईल म्हणून पत्रकार परिषदेत गुन्ह्यांचा तपशील त्यांनी दिला. संसदेत कायदे बनवले जातात तेथे शिक्षित खासदार राजकीय पक्षांनी उमेदवार दिला पाहिजे यासाठी विचार होण्याची गरज आहे मतदारांनी सुध्दा उमेदवारांचे शिक्षण, चरित्र व सामाजिक कार्य बघून मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
जाती धर्माच्या नावावर नाही तर विकासाच्या मुद्यावर निवडणुका व्हावे अशी अपेक्षा जलिल यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, धनगर समाजाचे अंकुश राठोड उपस्थित होते.
What's Your Reaction?