महागाई कमी करण्यात मोदी अपयशी, 87 टक्के वाढली बेरोजगारी - शरद पवार
महागाई कमी करण्यात मोदी अपयशी, 87 टक्के वाढली बेरोजगारी - शरद पवार
औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) महागाई व बेरोजगारी व मराठवाड्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर शरद पवार यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदी देशाचे नाही तर भाजपाचे पंतप्रधान आहे. 2014 मध्ये सत्तेत येण्याच्या अगोदर त्यांनी आश्वासन दिले होते माझ्या हातात सत्ता द्या 50 दिवसांत महागाई कमी करतो. इंधनाचे व गॅसचे दर पन्नास टक्क्यांवर येतील. सत्ता आल्यानंतर महागाई कमी तर झाली नाही उलट वाढली. यामुळे सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले. बेरोजगारीचा आकडा वाढत गेला. त्यांच्या कार्यकाळात 87 टक्के युवक बेरोजगार झाले आहे. हे मी सांगत नसून इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालात नमूद आहे. देशात ज्या पक्षांनी चांगले काम केले अशा विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. आदीवासी मुख्यमंत्री असलेले हेमंत सोरेन यांनी आदीवासी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मागणी केली त्यांना उचलून जेलमध्ये टाकले जाते. दिल्लीतील जनतेसाठी चांगले काम करत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही जेलमध्ये टाकले. लोकसभा निवडणूक सुरू असताना हे केले जात आहे. अशी वृत्ती देशाला हुकुमशाहीकडे नेणारी आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धाक दाखवून कारवाई केली जात आहे. आम्ही सत्तेत होतो तर दुष्काळाची स्थिती पाहणी करून बघत होतो. मोदींनी कधीही शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतल्या नाहीत. शेतीकडे ते बघतही नाही. मराठवाड्याची अवस्था बिकट आहे हे पहायला सुध्दा तयार नाही. पुढच्या पाच वर्षांत काय पंडित नेहरू लेखाजोखा मांडत होते मोदी काय करणार बोलत नाही तर इंडिया आघाडीवर व राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहे. मोदींना उद्योगपतींना मजबूत करण्यासाठी व सत्तेचा गैरवापर करण्यासाठी सत्ता हवी आहे. आपल्याला लोकशाही मजबूत करायची असेल तर भाजपाचा पराभव करावा लागेल असे आवाहन महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचार सभेत खासदार शरद पवार यांनी मतदारांना आवाहन केले आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार चंद्रकांत खैरे व जालना लोकसभा मतदारसंघातील डॉ.कल्याण काळे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
माजीमंत्री राजेश टोपे, काँग्रेसचे नेते अनिल पटेल, काॅ.एड अभय टाकसाळ, छावाचे शिवानंद भाणूसे, राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे नेते मुश्ताक अहमद, इलियास किरमानी, उमेदवार चंद्रकांत खैरे, डॉ.कल्याण काळे यांचे भाषण झाले. महाविकास आघाडीचे नेते मोठ्या प्रमाणात व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी शरद पवार यांचे स्वागत केले. सुत्रसंचलन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे यांनी केले. व्यासपीठावर आमदार उदयसिंह राजपूत, किशोर पाटील, सुधाकर सोनवणे, द्वारका भाऊ पाथ्रीकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, अशोक पटवर्धन, प्रकाश मुगदीया, कमाल फारुकी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महीला शहराध्यक्ष मेहराज इसाक पटेल, अनिस पटेल, डॉ.पवन डोंगरे, काँग्रेस महीला शहराध्यक्ष दिपाली मिसाळ, जिल्हाध्यक्ष दिक्षा पवार, इब्राहिम पठाण, नवीन मनमोहनसिंग ओबेरॉय, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष मो.ताहेर, समाजवादीचे शहराध्यक्ष फैसल खान, आम आदमी पार्टीचे निकम, दलित पँथरचे सुर्यकांत गंगाधर गाडे व महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते
.
What's Your Reaction?