नायलॉन मांजामुळे कुणाच्या आयुष्याची दोर तुटायला नको - सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे

नायलॉन मांज्यामुळे कुणाच्या आयुष्याचा दोर तुटायला नको
सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांचे आवाहन
मनसेच्या वतीने संस्कृती जोपासणारा पतंग महोत्सव जल्लोषात
जिल्हा सचिव अनिकेत निल्लावार यांच्या वतीने आयोजन...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) नायलॉन मांज्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. मांज्या मुळे पशु पक्षांनाही मोठी इजा होते. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प करत नायलॉन मांज्यामुळे कुणाच्या आयुष्याचा दोर तुटायला नको असे भावनिक आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांनी रविवारी (दि.12) केले. आपला सण, आपला स्वाभिमान...करू संस्कृतीचा नवनिर्माण हे ब्रीद घेऊन राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव, स्वामी विवेकानंद जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून “नवनिर्मान पतंग उत्सव” उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव अनिकेत निल्लावार यांच्या वतीने करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मनसे नेते सुहास दाशरथे, रस्ते अस्थापना जिल्हा संघटक अशोक पवार, यांची उपस्थिती होती. गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य नवनिर्माण पतंग उत्सवाचे खोकडपुरा येथे आयोजन करण्यात येते. 10 हजार मोफत पतंगाचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लहान मुलांना करण्यात आले. यावेळी मनसे नेते सुहास दाशरथे यांनी लहान मुलांना पतंग उडवताना काळजी घेण्याचे आवाहन करत नवनिर्माण पतंग उत्सवास शुभेच्छा दिल्या. मकर संक्रांत आपली संस्कृती लहान मुलांना तसेच नव्या पिढीमध्ये रुजावी या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असल्याची माहिती यावेळी आयोजक अनिकेत निल्लावार यांनी दिली. अजबनगर, खोकडपुरा , गांधी नगर, कैलास नगर तसेच पैठण गेट येथील लहान मुले, तरुण, नागरिकांनी या मोफत पतंग उपक्रमांचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विक्की जाधव, शिवा ठाकरे, अजय कागडा, अक्षय हिवाळे, रुपपर्ण गायकवाड, अविनाश जाधव यांनी पुढाकार घेतला. यावेळी पंकज शिंदे, सतीश देवगिरीकर, सोमू पाटील, अमित जैस्वाल, नारायण खरात, अशोक कात्रे, संतोष बांगर, मनोज भिणारे, अमित भांगे, अनुवेश गायकवाड, संजय दुर्बे, शौकत भाई, शेख अस्लम, कृष्णा शिंदे, रवी मक्शे, विशाल दुर्बे, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक सचिन लीला सुखदेव अंभोरे यांनी केले. यावेळी लहान मुलांना नायलॉन मांज्याचा उपयोग करण्यात येऊ नये याची शपथ देण्यात
आली.
What's Your Reaction?






