जिजाऊ, सावित्री आणि फातेमा यांचा आदर्श घेऊन मुलींनी शिक्षणाच्या बळावर स्वावलंबी बनावे - चंद्रकला जाधव

 0
जिजाऊ, सावित्री आणि फातेमा यांचा आदर्श घेऊन मुलींनी शिक्षणाच्या बळावर स्वावलंबी बनावे - चंद्रकला जाधव

जिजाऊ, सावित्री आणि फातेमा यांचा आदर्श घेऊन, मुलींनी शिक्षणाच्या बळावर स्वावलंबी बनावे - चंद्रकला जाधव

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज)

12 जानेवारी राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त तसेच 3 जाने क्रांतिज्योती सावित्री बाई फुले व 9 जाने क्रांतिमशाल फातेमा शेख यांच्या जयंती निमित्त भारतीय महिला फेडरेशन व परिवर्तन कम्प्युटर्स तर्फे विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून चंद्रकला जाधव तर मार्गदर्शक शाहीर वसुधा कल्याणकर, परिवर्तन कम्प्युटर्स चे संचालक कॉ.मधुकर खिल्लारे यांची उपस्थिती होती.

यावेळी चंद्रकला जाधव यांनी पालकांना संपूर्ण शिक्षण देत आधी स्वतःच्या पायावर उभे करावे, नंतरच त्यांच्या लग्नाचा विचार करावा. तसेच तरुण मुलांनी इतर मुलींना त्रास देताना आपल्या बहिणीचा विचार करावा असेही सांगितले. 

याआधी शाहीर वसुधा कल्याणकर यांनी राजमाता जिजाऊ, सावित्री, ज्योतिबा व फातेमा यांच्या इतिहास व त्याकाळच्या स्त्रियांच्या परिस्थिती वर प्रकाश टाकला. तसेच आजच्या आधुनिक काळात ही शिक्षण घेणाऱ्या व नोकरी करणाऱ्या तरुणींना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला.

कॉ.मधुकर खिल्लारे यांनी आधुनिक काळात स्त्रियांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे, आपले करिअर घडवावे तसेच तरुणांनी शिवबांप्रमाणे स्त्रियांचा आदर करावा असे आवाहन केले. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेने समाजासाठी काम करावे असे सांगितले.

प्रिया खिल्लारे ही विद्यार्थिनी जिजाऊच्या वेशभूषेत उपस्थित होती. यावेळी वेदांशु शेळके या विद्यार्थ्याने सुंदर असे लोकगीत सादर केले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते MS-CIT प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कावेरी दळवी यांनी केले.

कार्यक्रमावेळी इवरकर, सलोनी गायकवाड, स्नेहा, मयुरी कामोदे, शाम राठोड, रोहन कांबळे, चेतन वाहुळे, आदर्श राठोड, सोनाली गोठवाल, सोनाली क्षीरसागर, महेश पद्दीरवाड, प्रीतम खरात, राज तारगे, प्रिया खिल्लारे यांच्यासह पालकांचीही उ

पस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow