आझाद चौक व शहरातील इतर वाळू साठ्यांवर महसूलची जप्तीच्या कार्यवाईने खळबळ

शहरातील अवैध वाळू साठ्यांवर महसुलची कारवाई !
विविध भागातून जप्त केला शेकडो ब्रास साठा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.13(डि-24 न्यूज) : अवैध वाळू वाहतूक आणि साठ्यांवरवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. त्यानुसार अप्पर तहसील कार्यालयाने धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसात शहरातील विविध ठिकाणी विक्री होणारा वाळू साठा महसूल पथकाने जप्त केला. अप्पर तहसीलदार नितीन गर्जे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव प्रक्रिया सुरू आहेत. मात्र या लिलाव प्रक्रियेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. दुसरीकडे शहरात मोठ्या प्रमाणाव
र अवैध वाळूची विक्री होताना दिसून येते. अवैध वाळू वाहतूक आणि विक्रीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दोन दिवसांपूर्वीच दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी अप्पर तहसील कार्यालयाने सुरू केली आहे. टीव्ही सेंटर, राष्ट्रवादी भवन परिसरात असलेला वाळू साठा महसूल पथकाने जप्त केला. तसेच आझाद चौक, गारखेडा परिसरातील वाळूसाठ्यावरही या पथकाने कारवाई केली आहे.
पण वाळू साठा उचलला...
यापूर्वी महसूल पथक वाळू साठ्यावर कारवाई करीत सदर साठा जप्त करीत होते. मात्र हा साठा उचलला जात नव्हता. त्यामुळे कारवाई केल्यानंतरही सदर साठा चोरी होण्याचे प्रमाण मोठे होते. आता मात्र अप्पर तहसीलदार नितीन गर्जे यांनी वाळू साठा उचलण्याची कारवाई केली. त्यामुळे महसूल पथकाने जप्त केलेला वाळू साठा अप्पर तहसील कार्यालयाच्या आवारात आणून टाकला आहे. तहसीलदारांच्या पथकात नायब तहसीलदार प्रशांत देवडे, मंडळ अधिकारी कल्याण वानखरे, मंडळ अधिकारी शेखर शिंदे, मंडळ अधिकारी गणेश सोनवणे, मंडळ अधिकारी अभिलाषा म्हस्के, तलाठी धनंजय साळवे, तलाठी दगडू जरारे, दीपक सोनवणे, विनोद कुमार मुळे, प्रमोद निर्मळ, तलाठी श्रीमती गंगा जगताप, तलाठी कु. लक्ष्मी सोळंके, साईनाथ बोंद्रे, आशिष टोपले, समाधान पैठणे, तलाठी सायली विटेकर,, राजेंद्र आठवले, राजेंद्र सुलाने, सुरज गिरी, ज्ञानेश्वर क्षीरसागर, सतीश घुगे, सुरज गिरी, रोहित पवार, रश्मी पवार, स्वप्निल शेळके आदींचा समावेश
आहे.
What's Your Reaction?






