सामुहिक आजान देत काळा दिवस पाळला...
सामुहिक आजान देत काळा दिवस पाळला...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)- 6 डिसेंबर, अयोध्येत बाबरी मशीद पाडली त्या घटनेला 33 वर्ष झाली. त्या दिवसापासून दरवर्षी रजा अकादमीच्या वतीने चंपा चौक येथे बांधावर काळी फित लावून या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने सामुहिक आजान देत काळा दिवस पाळला जातो. दुपारी तीन वाजून 40 मिनटाने हाफीज आरीफ नुरी यांच्या मागे अजान देण्यात आली यानंतर देशात अमन व शांतता कायम राहावी यासाठी सामुहिक दुवा करण्यात आली. याप्रसंगी रजा अकादमीचे हुसैन रझवी, मौलाना आसेफ नजमी, आरोज रजा व मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. याप्रसंगी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
What's Your Reaction?