पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा श्री गणेश महासंघाच्या "श्री"ची प्राणप्रतिष्ठापना

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा श्री गणेश महासंघाच्या "श्री"चीं प्राणप्रतिष्ठापना
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) - गणेशोत्सवाला 'महाराष्ट्र राज्य उत्सव' म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर, यंदा होणारा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असून श्री गणेश चतुर्थी निमित्ताने छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या "श्री"चीं प्रतिष्ठापना बुधवारी (दि.27) पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आली. बंडू पुजारी गुरुजी यांनी विधिवत पूजा करून यावेळी श्री गणरायाची मान्यवरांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठापना केली.
यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार संदीपान भुमरे, राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड, राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष अभिजित देशमुख, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, उत्सव समिती अध्यक्ष अनिकेत निल्लावार, अशोक पटवर्धन, सचिन खैरे, राजेंद्र दानवे, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे, पोलिस निरीक्षक, सुनील माने, प्रभाकर मते, राजेश मेहता, कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील, महेश उबाळे, हरीश शिंदे, निनाद खोचे, विक्की जाधव, अजय कागडा, शिवा ठाकरे अविनाश जाधव अक्षय गायकवाड सोमवीर चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे यांची उपस्थिती होती.
हजारो गणेश भक्तांनी केला वृक्ष संवर्धनाचा संकल्प
छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समिती तसेच ऍम्ब्युलन्स हेल्प रायडर्स च्या सहकार्याने गणेशोत्सवात पर्यावरणाच्या संवर्धनार्थ सामाजिक दायित्व म्हणून "एक झाड... एक मंडळ" हे वृक्षारोपण अभियान बुधवारी (दि. 27) औरंगपुऱ्यात राबविण्यात आले. यावेळी हजारो गणेश भक्त तसेच मंडळानी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवून वृक्षाचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने यावर्षी पहिल्यांदाच एक झाड.... एक मंडळ ही संकल्पना राबवून गणेश भक्तांना झाडे लावण्याचे आवाहन करण्यात आले. गणपतीच्या प्रतिष्ठापने बरोबरच प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांनी केले होते. यासाठी उस्फुर्त प्रतिसाद यावेळी गणेशभक्तांनी या उपक्रमास दिला. पर्यायावरणाचा समतोल राखण्यासाठी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ऍम्ब्युलन्स हेल्प रायडर्स चे संदीप कुलकर्णी, प्रसाद कस्तुरे, गोविंद कुलकर्णी, सायली पिल्ले, सोहराम काझी, मनोज जोशी कल्पेश काथार, श्री गणेश महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे यांनी पुढाकार घेतला.
आज महा अथर्वशीर्ष पठण...
प्रत्येकावर आधात्माचे संस्कार व्हावेत आणि भाव भक्तीतून आपुलकीची ऊर्जा निर्माण व्हावी या हेतूने श्री गणेश महासंघ उत्सव समिती आणि वरद गणेश मंदिर ट्रस्ट च्या वतीने आज गुरुवार, (दि. 28) रोजी समर्थ नगर येथील वरद गणेश मंदिरात सकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान श्री गणेश भक्तांच्या सहभागाने “अथर्वशीर्ष महापठण” होईल. सर्व गणेश भक्त तसेच मंडळानी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन उत्सव समिती अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांनी केले आहे.
What's Your Reaction?






