तीन आमदारांवर टक्केवारीचा इम्तियाज जलिल यांचा आरोप... हातपाय तोडण्याची धमकी

 0
तीन आमदारांवर टक्केवारीचा इम्तियाज जलिल यांचा आरोप... हातपाय तोडण्याची धमकी

तीन आमदारांवर टक्केवारीचा इम्तियाज जलिल यांचा आरोप...हातपाय तोडण्याची धमकी

फडणवीस यांनी आतापर्यंत शहराला पाणी पाजले नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार....हंडा मोर्चा काढल्याची काढली आठवण, कराड, दानवे सुध्दा मोर्चात सहभागी झाले होते...

औरंगाबाद, दि.(डि-24 न्यूज) गंगापूर, पैठण, वैजापूर तालुक्यातील आमदारांवर 15 टक्के विकासकामे करण्यासाठी टक्केवारी घेण्याचा सनसनाटी आरोप आज पत्रकार परिषदेत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी लावला आहे.

त्यांनी पुढे सांगितले या तीन तालुक्यांत शेकडो कोटी निधी विकासासाठी आलेला आहे पण हे आमदार अधिका-यांना धमकावत आहे की टेंडर काढू नका हि कामे माझाच ठेकेदार करेल दुसरा कोणी ठेकेदार तेथे आला तर हात पाय तोडून टाकू, वरुन खालपर्यंत हि साखळी आहे. विकासासाठी टक्केवारीवरुन सध्या वाद सुरू आहे तर दुसरीकडे मराठवाड्यात पाऊस नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत याच्याशी या आमदारांना संवेदना नाही का...? असा सवाल जलिल यांनी सरकारला विचारला.

पैठणचे आमदार संदीपान भुमरे, गंगापूरचे आमदार प्रशांत बंब, वैजापूरचे आमदार प्रो.बोरनारे यांच्यावर टक्केवारी घेण्याचा आरोप जलिल यांनी लावला आहे. त्यांनी सांगावे मी खोटे बोलतो म्हणून आम्ही दुसऱ्या ठेकेदारांना स्वरक्षण देतो बिनधास्त टेंडर भरा पुढचे मी बघतो असा इशारा जलिल यांनी दिला आहे.

मागील मंत्री मंडळ बैठकीत जे निर्णय घेतले होते ती कामे झाली नाही या मंत्रीमंडळ बैठकीत सुध्दा घोषणांचा पाऊस पडणार आहे. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हे सुरु आहे. शेतकऱ्यांचे मराठवाड्यात हाल सुरू आहे तरीही सरकारने आतापर्यंत मदत दिली नाही. 2016 मध्ये ज्या घोषणा केली होती ती पूर्ण झाली नाही इरिगेशनचे कामांची सिबिआय व सिआयडी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली दूध का दूध पाणी का पाणी हो जायेगा. सरकारने या कामांची सखोल चौकशी करावी. 

जेव्हा फडणवीस विरोधी पक्षनेते होते महापालिकेच्या समोर भाजपाच्या वतीने पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला होता. आता फडणवीस सत्तेत आहे आतापर्यंत शहराला पाणी मिळाले नाही. पाण्यासाठी पुन्हा मोर्चा काढणार का फडणवीस साहेब असा टोला जलिल यांनी भाजपला लगावला. त्यावेळी महिलांना हंडे वाटण्यात आले होते मोर्चात ते अशा प्रकारचे डान्स करत होते कि शहराला पाणी मिळाले. आम्ही आश्वासने कधीपर्यंत सहन करावी.

16 सप्टेंबर रोजी भडकलगेट येथून आमखास मैदान येथे आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. ठेवीदारांनी गुंतवणूक केलेले पैसे परत मिळावे अशी आमची सरकारकडे मागणी आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांचा गणिमीकाव्याने घेराव करणार पण कोठे करणार असे जलिल यांनी सांगितले नाही. यावेळी जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजिद, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी उपस्थित होते.

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे हि माझी भुमिका आहे पण सध्याचे सरकार देतील असे मला वाटत नाही मग यांच्याकडे आरक्षणाची मागणी का करायची. जे लोक मुस्लिम आरक्षणाची मागणी करत आहे ते जेव्हा सत्तेत होते तेव्हा काय करत होते असे म्हणत काँग्रेस व राष्ट्रवादी वर टिका केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow