पवित्र हज यात्रेसाठी पहेला जत्था हज हाऊस येथून रवाना... देशात अमन व प्रगतीसाठी करणार दुवा
पवित्र हज यात्रेसाठी पहेला जत्था हज हाऊस येथून रवाना... देशात अमन व प्रगतीसाठी करणार दुवा...
हुज्जाज कमेटी, अल्तमश ग्रुपच्या खिदमातला सलाम...
औरंगाबाद, दि.1(डि-24 न्यूज) पवित्र हज यात्रेसाठी नवीन हज हाऊस येथून यात्रेकरुंचा पहेला जत्था रवाना झाला. एसी कोच बसमधून हा प्रवास मुंबई विमानतळापर्यंत सुरू झाला. बसला खासदार इम्तियाज जलील, सेंट्रल हज कमेटीचे सदस्य हाजी एजाज देशमुख, खिदमात ए हुज्जाज कमेटीचे अध्यक्ष मौलाना नसिमोद्दीन मिफ्ताई, पोलिस निरीक्षक जगताप यांनी हिरवी झेंडी दाखवली. पाच वाजेच्या दरम्यान पाच बसमधून हज यात्रेकरूंचा हा प्रवास सुरू झाला. उद्याही येथून यात्रेकरू हज यात्रेसाठी जाणार आहे. यंदा मुंबई व हैदराबाद विमानतळावरून थेट जेद्दा हा प्रवास मक्का मदीना साठी होणार आहे. दोन दिवसांत एक हजार यात्रेकरू जाणार आहे. 26 मे पासून हज यात्रेकरुंचा प्रवास सुरू झाला आहे.
सेंट्रल हज कमेटी व स्टेट हज कमेटीच्या वतीने हज यात्रेकरूंना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हज यात्रेकरुंची खिदमात करण्यासाठी हुज्जाज कमेटीचे सदस्य व अल्तमश ग्रुपने सहकार्य केले. याबद्दल सेंट्रल हज कमेटीचे सदस्य हाजी एजाज देशमुख यांनी आभार मानले.
यात्रेकरूंना भोजन व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, नशिस्तसाठी मार्गदर्शन, लगेज बसमध्ये ठेवणे व सुखरूप बसमध्ये यात्रेकरूंना बसविणे अशी खिदमत स्वयंसेवक करत होते.
यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले नवीन हज हाऊस येथून पवित्र हज यात्रेसाठी यात्रेकरु जात असल्याचा आनंद होत आहे. आमचा प्रयत्न होता येथून थेट विमान जेद्दासाठी सुरू व्हावे आम्ही त्यासाठी प्रयत्न केले ते शक्य झाले नाही. येणाऱ्या वर्षात अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करु. देशात अमन शांतीसाठी व प्रगतीसाठी तेथे जाऊन दुवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डि-24 न्यूजला यात्रेकरूंनी सांगितले की मराठवाड्यातील हज यात्रेकरूंसाठी नवीन हज हाऊसमुळे सुविधा झाली असल्याचा आनंद व्यक्त केला. येथे यात्रेकरूंना दिल्या जाणाऱ्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले. देशात अमन शांतीसाठी व प्रगतीसाठी दुवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यात्रेकरूंना सोडण्यासाठी आलेल्यांनी परिसरात गर्दी केली होती. लहान बालकांना गळे लाऊन आनंदाश्रू वाहू लागले होते.
यावेळी सरताज खान, हामद चाऊस, एजाज सिद्दीकी, जब्बार बागवान, मसीयोद्दीन सिद्दीकी, याकूब खान, शेख हमीद, शेख मुनाफ, शेख सलिम चिश्ती, सय्यद सलिम, शाकेर राजा, कासम पटेल, समीर जावेद कुरैशी, इरफान खान, सय्यद इरफान आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?