रायगडानंतर देवगिरीच्या किल्ल्यावर शरद पवारांची वाजली तुतारी...!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचे दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी दिमागदार सोहळ्यात अनावरण...
दौलताबाद ,दि.24(डि-24 न्यूज) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी निवडणूक चिन्हाचे आज शनिवारी सायंकाळी दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तुतारी वाजवून एकच जल्लोष केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह बहाल केले आहे. आज पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या हस्ते रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी तुतारी निवडणूक चिन्हाचे अनावरण करण्यात आले. मोठ्या उत्साहात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी तुतारी चिन्हाचे अनावरण करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील व शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांच्या हस्ते तुतारीला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर तुतारी वाजवून चिन्हाचे अनावरण करण्यात आले. सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तुतारी वाजवून एकच जल्लोष केला. यावेळी जिल्ह्यातील तालुके व गावात आणि शहरातील वार्डात राष्ट्रवादीची तुतारी चिन्ह लोकसभा निवडणूक अगोदर पोहोचले पाहिजे यासाठी जास्तीत जास्त सोशल मीडियावर व लेटर हेड व विजिटींग कार्ड बनवून जनतेचे प्रश्न आणखी जोमाने उचलून न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी केले.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, सुधाकर सोनवणे, विनाताई खरे, युवक जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे, डॉ. ज्ञानेश्वर निळ महिला जिल्हाध्यक्ष छाया ताई जंगले पाटील, मोतीलाल जगताप यांच्यासह तालुका अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करून पक्षाचे चिन्ह प्रत्येक खेडोपाडी पोहोचवावे असे आवाहन केले. यावेळी ज्येष्ठ नेते सुधाकर सोनवणे, प्राचार्य शेख सलीम, विश्वजीत चव्हाण, उद्धव बनसोडे, छायाताई जंगले, रज्जाक पठाण, राजेश साळुंके, सलिकोद्दीन चिश्ति, शेख शफीक, राजेश पवार, मालती निकम, उमा नेव्हल, मोतीलाल जगताप, प्रसन्ना पाटील, प्रशांत पवार, रिझवान पटेल, कडू शहा आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






