सर्व विभागांनी समन्वय राखून गैरप्रकार रोखावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
सर्व विभागांनी समन्वय राखून गैरप्रकार रोखावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने प्रशासन सर्व तयारी करत असतांना निवडणूकीत मतदारांना अमिष दाखवण्याच्या अनुषंगाने केले जाणारे गैरप्रकार सर्व विभागांनी आपापसात समन्वय राखून रोखावे,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
निवडणूक काळातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आज सर्व विभागप्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, आयकर आयुक्त, विमानतळ प्रबंधक, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, रेल्वे पोलीस, महामार्ग पोलीस, परिवहन विभाग, वन विभाग असे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक काळात अवैध मार्गाने येणारी रोकड, मद्य वाहतूक, वा अन्य मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बाबींची तपासणी करण्यासाठी सर्व पातळ्यांवर तपासणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी विमानतळ, हेलिपॅड, रेल्वेस्थानक, लक्झरी बसेस, कंटेनर इ. वाहने अशांचा वापर करुन अशाप्रकारे वाहतुकीसाठी उपयोग होतोय का ही तपासणी करावी. त्यासाठी सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय राखावा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
What's Your Reaction?