पूर्व विधानसभा मतदारसंघातून दोन उमेदवारी अर्ज दाखल, गंगापूर मधून दोन
पूर्व विधानसभा मतदारसंघातून दोन उमेदवारी अर्ज दाखल, गंगापूर मधून दोन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) आज दुस-या दिवशी विधानसभा मतदारसंघ निवडणूक-2024 , औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून दोन उमेदवारी तर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून दोन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.
औरंगाबाद पूर्व मधून अपक्ष मोहम्मद इसा यासिन, शेख ख्वाजा किस्मतवाला कासिम, गंगापूर मधून शिवाजी बापूराव खुबे, गोरख जगन्नाथ इंगळे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातून 175 जणांनी 385 उमेदवारी अर्ज घेतले आहे.
सिल्लोड मधून 28 जणांनी 65 अर्ज, कन्नड मधून 20 जणांनी 41, फुलंब्री मधून 28 जणांनी 63, औरंगाबाद मध्य मधून 22 जणांनी 41, औरंगाबाद पूर्व मधून 20 जणांनी 53, पैठण मधून 16 जणांनी 32, गंगापूर मधून 23 जणांनी 47, वैजापूर मधून 8 जणांनी 20 अर्ज घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
What's Your Reaction?