एसडीपिआय भाजपाला रोखण्यासाठी पर्याय म्हणून निवडणूकीच्या रिंगणात...!

एसडीपिआय भाजपाला रोखण्यासाठी पर्याय म्हणून निवडणूकीच्या रिंगणात...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज)
विधानसभा निवडणुकीत भाजपा व महायुतीला सत्तेपासून रोखण्यासाठी पर्याय म्हणून निवडणूकीच्या रिंगणात एसडिपिआय पक्ष उतरला आहे. औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद मध्य, पैठण या तीन विधानसभा निवडणुकीत उमेदवार मैदानात उतरवले आहेत. सकारात्मक विचार, कल्याणकारी महाराष्ट्र व समान न्याय या मुद्यावर निवडणूक आहे. एसडिपिआय हा पक्ष लोकशाहीला व संविधानाला मानणारा राजकीय पक्ष आहे. या पक्षाबद्दल नकारात्मकता जोडण्याचा विरोधक प्रयत्न करतात परंतु कोणत्याही समाजाचा आदर करुन ज्या समाजावर अन्याय झाला त्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात. देशात जातीनिहाय जनगणना करुन मागासलेल्या समाजाला मुख्य धारेत आणण्यासाठी आरक्षण दिले पाहिजे अशी भुमिका पक्षाची आहे. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात दहा वर्षांपासून एकच आमदार निवडून येतो त्यांनी दलित मुस्लिम वस्त्यांमध्ये विकास केला नाही. विरोधकांनी त्यांना जाब पण विचारला नाही की या वस्त्यांचा विकास का केला नाही अनेक नागरी समस्या या मतदारसंघात आहे म्हणून या निवडणुकीत मतदार आमच्या बाजूने उभे राहतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
त्यांनी पुढे सांगितले राज्यात एक समाज दुस-या समाजाविरोधात मोर्चे काढले जात आहे. विशिष्ट धर्माच्या प्रेषितांच्या विरोधात हेट स्पिच केले जातात त्या हेट स्पिच करणारे विरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही म्हणून या निवडणुकीत एसडिपिआयला पसंती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही मतांच्या विभाजनासाठी मैदानात उतरलो नाही तर समाजाला न्याय मिळवून देण्याची आमची भुमिका आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सय्यद कलिम, औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मुजंमिल खान, पैठण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ.हाफिज इम्रान शेख, प्रदेश उपाध्यक्ष अशोक धनगांवकर, प्रदेश कोषाध्यक्ष युसुफ पटेल, जिल्हाध्यक्ष साकी अहमद, जिल्हा उपाध्यक्ष जब्बार खान, जिल्हा महासचिव नदीम शेख, जिल्हा कोषाध्यक्ष हाफिज अबुजर पटेल, माजी जिल्हाध्यक्ष मोहसीन खान, जिल्हा सदस्य अशरफ पठाण, समीर शाह, रियाज शेख, हाफिज समीउल्लाह व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?






