जिल्हाधिका-यांची घाटी रुग्णालयास भेट व पाहणी
जिल्हाधिकाऱ्यांची घाटी रुग्णालयास भेट व पाहणी
‘घाटी’ची प्रतिष्ठा व प्रतिमा जपा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज):- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट देऊन पाहणी केली. उपस्थित सर्व डॉक्टर्सशी संवाद साधतांना ‘घाटी’ची प्रतिष्ठा व प्रतिमा जपण्याचे आवाहन करतांनाच आगामी लोकसभा निवडणूकीसाठी डॉक्टर या नात्याने मतदार जनजागृतीत आपले योगदान द्यावे असे आवाहनही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या भेटी प्रसंगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी रुग्णालयाची पाहणी केली. बाह्यरुग्ण कक्ष, उपचार कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष, डायलिसिस सेंटर असे विविध कक्ष त्यांनी बघितले. निवडणूक काळात अकस्मात तब्येत बिघडल्यास अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बेड्स राखीव ठेवण्याबाबत सुचनाही त्यांनी केली.
उपस्थित डॉक्टर्सशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, ईश्वराची उपमा मिळालेला एकमेव व्यवसाय म्हणून वैद्यकीय व्यवसायाकडे पाहिले जाते. त्याप्रमाणे आपले वर्तन असायला हवे. ‘घाटी’ रुग्णालयाची प्रतिष्ठा आजही कायम आहे. ही प्रतिष्ठा व प्रतिमा जपा असे आवाहन त्यांनी केले. सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणूकीत मतदार जनजागृतीत सहभाग घ्या. डॉक्टर्सच्या शब्दाला लोक मान देतात. आपल्या माध्यमातून लोकांना मतदान करण्याचा संदेश दिला जावा. महाविद्यालयामार्फत काही उपक्रम राबवावे,असे आवाहन त्यांनी केले.
What's Your Reaction?