प्रभाग क्रमांक 28, बीड बायपास येथे एमआयएमचा राष्ट्रवादीला दे धक्का...

 0
प्रभाग क्रमांक 28, बीड बायपास येथे एमआयएमचा राष्ट्रवादीला दे धक्का...

प्रभाग क्रमांक 28 बीड बायपास येथे एमआयएमचा राष्ट्रवादीला दे धक्का...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) - बीड बायपास प्रभाग क्रमांक 28 मध्ये एमआयएमने राष्ट्रवादी शरदचंद्र पार्टीला धक्का देत सर्व चार नगरसेवक निवडून आल्याने शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला यांच्या 20 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शेख साबेर पटेल यांच्यासह चार नगरसेवक निवडून आल्याने नवीन नेतृत्व बीड बायपास परिसरात उभे राहिले आहे. ख्वाजा शरफोद्दीन व त्यांच्या पत्नी यांनी दोनदा या वार्डाचे प्रतिनिधित्व केले आहे. या निवडणुकीत शरदचंद्र पवार पार्टीच्या वतीने ख्वाजा शरफोद्दीन व त्यांच्या पत्नी पॅनलमध्ये या निवडणुकीत उभे होते परंतु एमआयएमच्या लाटेत पॅनलला पराभव पत्करावा लागला आहे. प्रचारात राष्ट्रवादी पुढे असताना मोठा पराभव पत्कारावा लागल्याने शहराध्यक्ष पद धोक्यात येऊ शकते अशी चर्चा आहे. ते या प्रभागात निवडणूक लढत असल्याने आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात फिरकले नाहीत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचा एकच नगरसेवक निवडून आल्याची माहिती मिळतआहे. प्रभागात वाहुळ सुनीता मनोज, खान अब्दुल मतीन, नसीम बेगम मोहम्मद अफसर, शेख साबेर पाशू यांचा या प्रभागातून विजय झाल्याने कार्यकर्त्यांनी हिरवा गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow