बाबा रामगिरी, नितेश राणे यांना अटक करा, या मागणीसाठी बेमुदत साखळी आंदोलन सुरू
बाबा रामगिरी, नितेश राणे यांना अटक करा, या मागणीसाठी बेमुदत साखळी आंदोलन सुरू
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) वक्तव्य वक्तव्य करणारे बाबा रामगिरी व नितेश राणे यांना अटक करा व विविध मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मुस्लिम नुमायंदा कौन्सिलच्या वतीने आज दुपारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या विरोधात कोणीही अपशब्दाचा प्रयोग करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी असले वक्तव्य करु नये तथा कोणत्याही धर्माचे देवी, देवता, धर्मगुरु यांच्या विरोधात अपशब्द बोलू नये यासाठी वक्तव्य करणाऱ्या विरोधात कठोर शिक्षेचे प्रावधान करण्यासाठी कडक कायदा बनवावा. केंद्र सरकारने आणलेले वक्फ बील-2024 हे सुधारणा बील परत घ्यावे. औरंगाबाद शहराचे नाव जशास तसे ठेवावे. नवीन शहराला छत्रपती संभाजिनगर नाव देऊन दोन महानगरपालिका अस्तित्वात येईल असा निर्णय घ्यावा.
यावेळी मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे अध्यक्ष जियाउद्दीन सिद्दीकी, महासचिव मेराज सिद्दीकी, मौलाना इलियास फलाही, मौलाना शरीफ निजामी, अब्दुल मोईद हशर, मौलाना नोमान नदवी, मोहम्मद रजा, अॅड सलिम खान, कामरान अली खान, मोहम्मद हिशाम उस्मानी, डॉ.शोएब हाश्मी, जावेद कुरैशी, नासेर सिद्दीकी, मौलाना अन्वरुल हक, अॅड फैज सय्यद, इलियास किरमानी, फैसल खान, सलिम सिद्दीकी, मोहसीन खान, वसिम सिद्दीकी, तौहिद पठाण, सकी अहेमद, झाकीर पटेल, साहेबखान पठाण आदी उपस्थित होते
.
What's Your Reaction?