श्री गणेश महासंघ शंभर वर्षे टिकवणे अभिमानास्पद, मुख्यमंत्र्यांनी केले महासंघाचे कौतुक
श्री गणेश महासंघ शंभर वर्ष टिकवणे अभिमानास्पद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महासंघाचे कौतुक
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत मध्यरात्री गणरायाचे विसर्जन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) विविध गणेश मंडळे, महासंघ अनेक स्थापन होतात, मात्र त्या मंडळाचे कार्य टिकवने खुप अवघड असते. छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्री गणेश महासंघाने विविध सामाजिक उपक्रम राबवत श्री गणेश भक्तांची बांधिलकी जोपासली आणि यंदा शंभर वर्ष पूर्ण केले याचा अभिमान वाटतो. असे म्हणत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समिती अध्यक्ष ऋषिकेश सरोज प्रदीप जैस्वाल आणि सर्व टीमचे कौतुक केले. समर्थ नगर येथील जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या मध्यवर्ती कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणरायाची आरती मंगळवारी (दि. 17) करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे सरकार विविध योजना राबवत आहे. आणि या योजनातून मिळालेला आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर या गणेशोत्सवात दिसून येत आहे. राज्यात चांगला पाऊस पडल्याने शेतकरी समाधानी असून सर्वाना चांगले आरोग्य मिळावे यासाठी त्यांनी गणरायाला साकडे घातले. लाडकी बहीण योजना तसेच लाडक्या भावालाही विविध योजनेतून लाभ मिळवून देण्यासाठी हे सरकार कटीबद्ध असून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे चांगले करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करेल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित श्री गणेश भक्तांना दिले. यावेळी त्यांनी विविध नागरिकांचे म्हणणे ऐकून निवेदने स्वीकारली. यावेळी खासदार संदीपान भुमरे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार तथा शिवसेना महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल, शिवसेना प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट, शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत, श्री गणेश महासंघाचे कार्याध्यक्ष तनसूख झांबड, विशाल दाभाडे संदीप शेळके, हरिश शिंदे, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे, कुणाल तायल,निखिल चव्हाण, संजय राखुंडे, सौरभ यादव, शुभम अग्रवाल,विनायक वेंन्नम,अक्षय लिंगायत, राजू मन्सूरी, आदित्य शर्मा, अजिंक्य सुरळे, ऋत्विक अग्रवाल, भूषण इंगळे, देवा अडणे, प्रतीक गायकवाड, विशाल काकडे, स्वप्नील उपाध्ये, सुमित दंडूके, अनिल सोनवणे यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत मध्यरात्री गणरायाचे विसर्जन
जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या लाडक्या गणरायाची मध्यरात्री पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आरती करून गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, श्री गणेश महासंघाचे कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील, विशाल दाभाडे संदीप शेळके, हरिश शिंदे, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे, कुणाल तायल,निखिल चव्हाण, संजय राखुंडे, सौरभ यादव, शुभम अग्रवाल,विनायक वेंन्नम,अक्षय लिंगायत, राजू मन्सूरी, आदित्य शर्मा, अजिंक्य सुरळे, ऋत्विक अग्रवाल, भूषण इंगळे, देवा अडणे, प्रतीक गायकवाड, विशाल काकडे, स्वप्नील उपाध्ये, सुमित दंडूके, अनिल सोनवणे यांची उपास्थिती होती. श्री गणेश भक्तांसाठी जिल्हा परिषद विसर्जन विहिरीजवळ प्रसिद्ध गायिका सरला शिंदे, अभिजित शिंदे यांच्या "आलाप" या भक्ती संगीत गीत गायणाचा कार्यक्रम आयोजित कlरण्यात आला होता. यावेळी लहान गणेश भक्तांनी विविध गीतावर नृत्य सादर करून गणपती बाप्पांचा जयघोष केला.
What's Your Reaction?