मालमत्ता करात सूट मिळेल या भ्रमात राहू नका, मालमत्ता कर भरण्याचे मनपा प्रशासकांचे आवाहन

मालमत्ता करात सूट मिळेल या भ्रमात नागरिकांनी राहू नये...
लवकरात लवकर मालमत्ता कर भरण्याचे मनपा प्रशासकांचे आवाहन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
दि.26 फेब्रुवारी(डि-24 न्यूज) मालमत्ता करात सूट मिळेल किंवा व्याज माफी मिळेल या भ्रमात न राहता नागरिकांनी लवकरात लवकर आपले मालमत्ता आणि पाणीपट्टी कर भरून सहकार्य करावे असे आवाहन आज महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केले.
ते म्हणाले की यावर्षी मालमत्ता आणि पाणीपट्टी करात कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही. करिता नागरिकांनी आपले कडील थकीत कर भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे. करातून मिळणाऱ्या पैशातून महानगरपालिका पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन इत्यादी प्रकल्प आणि इतर नागरी सुविधा पुरविण्याचे काम करते. नागरिकांनी वेळेवर कर भरला तर नागरी सुविधा मध्ये वाढ होईल ते म्हणाले. ज्यांचे मालमत्ता कराबाबत वाद होते किंवा शंका होती ते दर शुक्रवारी कर समाधान शिबिर घेऊन निकाली काढण्यात आले आहे. कर समाधान शिबिरात एकूण 47 प्रकरण निकाली काढण्यात आले आहेत.
याशिवाय करा बाबत नागरिकांना काही शंका राहू नये यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर टॅक्स कॅल्क्युलेटर देण्यात आलेला आहे. यावर नागरिक आपली मालमत्तेचे कर स्वतः आकारू शकतात.
या सर्व सुविधांच्या लाभ घेऊन नागरिकांनी मालमत्ताकर भरून महानगरपालिकेला बळकट करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
मालमत्ता कर निर्धारक व संकलक अपर्णा थेटे म्हणाल्या की मालमत्ता कर थकबाकी पोटी मालमत्तेला सील लावणे आणि त्याचा लिलाव करणे सुरूच आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत 10.59 कोटी कर जमा झाला आहे. लोक अदालत येथे एकूण 827 प्रकरणे निकाली काढल्याने आणि डबल एन्ट्री व इतर कारणाचे एकूण 238 प्रकरण निकाली काढण्यात आले आहेत. त्याच्यातून एकूण 10.59 कोटी कर वसूल झाला आहे, त्या म्हणाल्या. लोक अदालत येथे एकूण 8253 प्रकरण दाखल असून सुमारे 268.58 कोटी कर थकीत आहे.
नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी मालमत्ता कराचा त्वरित भरणा करून सिलिंगची किंवा लिलावाची प्रक्रिया थांबवावी अन्यथा सदरील कारवाई सुरूच राहणार आहे, थेटे म्हणाल्या. करिता नागरिकांनी आपल्याकडील थकीत व नियमित मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणा त्वरित करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
What's Your Reaction?






